दोन अनोळखे व्यक्ती प्रेमात पडल्यानंतरचा प्रवास

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

दोन अनोळखी व्यक्ती प्रेमात पडल्यावर कुटुंबीयांचा विचार न करता त्यांच्या आयुष्याचे पुढील निर्णय स्वतः घेतात. मात्र, त्याचा कुटुंबीयांवर विपरीत परिणाम होतो. हेच नेमकं या चित्रपटामध्ये मांडण्यात आलं आहे.

मराठीमध्ये सध्या प्रेमकथेवर आधारित बरेच चित्रपट येत आहेत. या चित्रपटांमध्ये आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे आणि तो चित्रपट म्हणजे ‘तुझीच रे...’ प्रवीण राजा दिग्दर्शित या चित्रपटाची कथा थोडी हटके आहे.

दोन अनोळखी व्यक्ती प्रेमात पडल्यावर कुटुंबीयांचा विचार न करता त्यांच्या आयुष्याचे पुढील निर्णय स्वतः घेतात. मात्र, त्याचा कुटुंबीयांवर विपरीत परिणाम होतो. हेच नेमकं या चित्रपटामध्ये मांडण्यात आलं आहे.

इजाबेल म्युझिक ॲण्ड एंटरटेन्मेंट निर्मित या चित्रपटात बरेच नवे चेहरे दिसणार आहेत. प्रियंका यादव, मिलिंद गवळी, सुखुमी पेंडसे, आनंदा कारेकर आदी कलाकारांच्या या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या २१ जूनला प्रदर्शित होणार आहे. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News