गुणवत्ता यादीबाबत दोन हरकती; पिंपरी-चिंचवडमधील मार्गदर्शन केंद्रांना अल्प प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 8 July 2019

पिंपरी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या हरकती मांडता याव्यात, यासाठी रविवारी (ता. ७) शिक्षण उपसंचालक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. तथापि, पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गदर्शन केंद्राला अल्प प्रतिसाद मिळाला. येथे केवळ दोनच हरकती दाखल झाल्या.

पिंपरी - सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर केल्यानंतर विद्यार्थ्यांना त्यांच्या हरकती मांडता याव्यात, यासाठी रविवारी (ता. ७) शिक्षण उपसंचालक कार्यालय सुरू ठेवण्यात आले होते. तथापि, पिंपरी-चिंचवड शहरातील मार्गदर्शन केंद्राला अल्प प्रतिसाद मिळाला. येथे केवळ दोनच हरकती दाखल झाल्या.

पिंपरी-चिंचवड शहरात सुमारे ७५ कनिष्ठ महाविद्यालये आहेत, त्यासाठी श्री म्हाळसाकांत कॉलेज, श्रीमती ताराबाई मुथा प्रशाला व ज्युनिअर कॉलेज, प्रतिभा ज्युनिअर कॉलेज, नवमहाराष्ट्र विद्यालय, भारतीय जैन संघटना, श्री भैरवनाथ माध्यमिक ज्युनिअर कॉलेज, बा. रा. घोलप कनिष्ठ महाविद्यालय, मराठवाडा मित्र मंडळाचे कनिष्ठ महाविद्यालय अशा झोन आठ आणि नऊमध्ये मार्गदर्शन केंद्राची सोय केली आहे.

सर्वसाधारण गुणवत्ता यादी शुक्रवारी (ता. ५) रात्री अकरा वाजता जाहीर झाल्यानंतर शनिवारी (ता. ६) त्याबाबत हरकती नोंदविणे आवश्‍यक होते; परंतु प्रत्यक्षात हरकतीचे अर्ज घेण्याबाबत कोणतीही सूचना या शाळांना दिलेली नाही, त्यामुळे काही पालकांनी मार्गदर्शन केंद्रावर धाव घेतली. पण, तेथे हरकती घेतल्या नाहीत. अखेर पालकांना पावसात धावपळ करून उपसंचालक कार्यालयात हे अर्ज जमा करावे लागले होते. माध्यमिक शाळा, मार्गदर्शक केंद्रे आणि उपसंचालक कार्यालय यांच्यात समन्वय नसल्याने शनिवारी झालेल्या गोंधळाची दखल मंत्रालय स्तरावर घेण्यात आली. विद्यार्थ्यांना त्यांच्या हरकती रविवारीही मांडता याव्यात, यासाठी शिक्षण उपसंचालक कार्यालय व मार्गदर्शन केंद्रे सुरू ठेवण्यात आली. परंतु पालक व विद्यार्थ्यांचा फारसा प्रतिसाद मिळाला नाही. 

शनिवारी केवळ दोनच मुलांनी हरकती नोंदविल्या, त्यामध्ये एका विद्यार्थ्याचा आरक्षणाचा प्रवर्ग चुकला आहे. तर दुसऱ्या विद्यार्थ्याला नवीन मराठा आरक्षण लागू झाले असले तरीदेखील सर्वसाधारण प्रवर्गातून प्रवेश घ्यायचा आहे. सोमवारीही (ता. ८) विद्यार्थ्यांना हरकती व सूचना मांडता येतील.
- ए. एम. शेख, प्राचार्य, म्हाळसाकांत महाविद्यालय

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News