पुन्हा दोन कोचिंग क्लास सील, वसतीगृहे रडारवर

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 13 June 2019

महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

अकोला - सुरत येथील कोचिंग क्लासच्या आगीच्या प्रकरणानंतर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने शहरातील कोचिंग क्लासमधील अग्निशमन यंत्रणा बसविण्याचा विषय गांभिर्याने घेत सोमवारपासून कठोर कारवाई सुरू केली. सोमवारी चार कोचिंग क्लास सील करण्यात अाले होते. त्यानंतर बुधवारी (ता.१२) पुन्हा कारवाई करीत दोन कोचिंग क्लास सील करण्यात अाले अाहेत. 
शहरातील कोचिंग क्लासेस निव्वळ कमाईच्या मागे लागले असून, विद्यार्थी सुरक्षा वाऱ्यावर सोडण्यात आली आहे.

महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने या क्लासेसची झाडाझडती घेऊन संचालकांना सुरक्षेचे पुरेशे उपाय करण्याच्या सूचना दिल्या होत्या. असे असतानाही ६४ पैकी केवळ २३ कोचिंग क्लासेसमध्ये अग्नी सुरक्षेच्या उपाययोजना सुरू करण्यात अाल्याची माहिती देण्यात अाली अाहे. तर सूचना देऊनही उपाय योजना न करणाऱ्या कोचिंग क्लासेसच्या संचालकाना सात दिवसाचा अल्टीमेटम ३१ मे रोजी देण्यात अाला होता.

याची डेडलाईन संपताच, सोमवारपासून कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. सोमवारी केलेल्या कारवाईत चार कोचिंग क्लास सील करण्यात अाले होते. त्यामधील दोन कोचिंग क्लासच्या संचालकानी अनुपालन अहवाल देऊन काम सुरू अाहे. तर दोन कोचिंग क्लासेसच्या इमारती अद्यापही सील अाहे. यातच बुधावारी केलेल्या कारवाईत पुन्हा दोन कोचिंग क्लासेस सील करण्यात अाले अाहेत. 

आता वसतीगृहे रडारवर
शहरातील कोचिंग क्लासेससोबतच विद्यार्थी जिथे वास्तव्यास असतात त्या वसतीगृहामध्ये अग्नी सुरक्षेच्या योजना नाहीत. अशा वसतीगृहांची संख्या शहरात १३ असून, त्यांना नोटीस देण्यात अाल्या अाहेत. यातील दोन वसतीगृहानी अनुपालन अहवाल दिला असून, काम सुरू केले अाहे. उर्वरीत १३ कोचिंग क्लासेस अाता अग्नीशमन विभागाच्या रडारवर अाहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News