विश्‍वचषकात गाजतोय सट्ट्याचा बाजार, पाहा कोणत्या सामन्याला लागला होता सर्वात जास्त सट्टा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 24 June 2019

मुंबई - विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यांवर सट्टा घेणाऱ्या दोघांना अमली पदार्थ विरोधी पथकाने नुकतीच ग्रॅंट रोड येथील हॉटेलमधून अटक केली. विश्‍वास टाकळकर (५१) आणि अजय कांतराज (२४) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून आठ मोबाईल फोन, एक एलसीडी टीव्ही आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यांच्या रॅकेटने १४ कोटी रुपयांची सट्टेबाजी घेतल्याचे या दोघांकडून जप्त केलेल्या डायऱ्यांवरून स्पष्ट झाले आहे. या रॅकेटचे धागेदोरे कोलकात्यापर्यंत पोचल्याचे पोलिसांनी सांगितले.

टाकळकर आणि कांतराज पोपट लाईनवरून विश्‍वचषक स्पर्धेतील वेस्ट इंडिज व न्यूझिलंड दरम्यानच्या सामन्यावर सट्टेबाजी घेत होते.
आरोपींनी घेतलेला सट्टा
तारीख     सामना                                       सट्ट्याची रक्कम
१२ जून    ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान             एक कोटी ८३ लाख
१५ जून    ऑस्ट्रेलिया वि. श्रीलंका                  ९० लाख ६० हजार
१६ जून    भारत वि. पाकिस्तान                    एक कोटी साठ लाख
१७ जून    वेस्ट इंडीज वि. बांगलादेश              दोन कोटी ३६ लाख
१९ जून    न्यूझीलंड वि. दक्षिण आफ्रिका         दोन कोटी ६२ लाख
२० जून    ऑस्ट्रेलिया वि. बांगलादेश              एक कोटी २६ लाख
२१ जून    इंग्लंड वि. श्रीलंका                        एक कोटी ९९ लाख

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News