अभिनेता विकी कौशलच्या करिअरचा टर्निंग पॉईंट

काजल डांगे
Saturday, 10 August 2019

 

  • या चित्रपटात कमांडोची भूमिका साकारणारा विकी
  • ‘उरी’ बॉक्‍स ऑफिसवर तुफान गाजला
  • ‘हाऊज द जोश...’ हे वाक्‍य ऐकलं

मुंबई : ‘उरी द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपट अभिनेता विकी कौशलच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. जम्मू-काश्‍मीरमधील उरी येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात काही भारतीय जवान शहीद झाले. मात्र या हल्ल्यानंतर भारतीय जवानांनीही पाकव्याप्त काश्‍मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक केला. याच घटनेवर आधारित हा चित्रपट प्रेक्षकांच्या अंगावर शहारे आणणारा होता.

या चित्रपटात कमांडोची भूमिका साकारणारा विकी तर भलताच भाव खाऊन गेला. त्याने या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत पडद्यावर दिसून आली. ‘उरी’ बॉक्‍स ऑफिसवर तुफान गाजलाच. त्याचबरोबरीने या चित्रपटातील संवाद अधिक प्रेरणादायी ठरले. त्यातीलच विकीचा एक संवाद म्हणजे ‘हाऊज द जोश...’ प्रत्येकाच्या अंगात जोश संचारणारा हा संवाद विशेष लक्षवेधी ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धार हे त्यांच्या बालपणी बऱ्याचदा आर्मी क्‍लबमध्ये जात.

त्याच वेळी त्यांनी त्या क्‍लबमध्ये काही आर्मी ऑफिसर यांच्या तोंडी ‘हाऊज द जोश...’ हे वाक्‍य ऐकलं होतं. हेच वाक्‍य लक्षात ठेवून त्यांनी ‘उरी’मध्ये याचा वापर केला. खरं तर या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान विकीने हा संवाद म्हणताच सेटवरील उपस्थितीत लोकही भारावून गेले. हा संवाद विशेषतः तरुणांमध्ये फारच गाजला. रोनी स्क्‍रूवाला निर्मित हा चित्रपट यशस्वी होण्यामागे यामी गौतम, परेश रावल, मोहित रैना, कीर्ती कुल्हारी यांचेही महत्त्वपूर्ण योगदान होते.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News