कुत्रा चावल्याने तूळजापूरच्या युवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 2 August 2019
  • औरंगाबाद येथे आईवडिलांसोबत करायचा मजूरी
  • चार पाच महिन्यापूर्वी त्याला एका कुत्र्याने चावा घेतला होता मात्र याबाबत वेळेवर योग्य तो औषध उपचार न मिळाल्यामुळे त्याची अचानक प्रकृती बिघडली​

अकोला - तालुक्यातील तुळजापूर येथील १५ वर्षीय युवकाला कुत्रा चावल्याने त्याचा बुधवारी उपचारादरम्यान  मृत्यू झाला असून गुरुवारी ता.१ ऑगस्ट रोजी त्याच्या पार्थीवावर अंत्यत शोकाकुल वातावरणात  अंत्यसंस्कार करण्यात आले ही घटना औरंगाबाद येथे घडली.

पातुर तालुक्यातील संदेश रमेश राठोड वय सोळा वर्ष हा आपल्या आई-वडिलांसोबत औरंगाबाद येथे मजुरी करण्यासाठी गेला होता. त्याचे आई-वडील एका खाजगी कंपनीत काम करीत असून संदेशसुद्धा मजुरी करीत होता.

चार पाच महिन्यापूर्वी त्याला एका कुत्र्याने चावा घेतला होता; मात्र याबाबत वेळेवर योग्य तो औषध उपचार न मिळाल्यामुळे त्याची अचानक प्रकृती बिघडली त्यामुळे त्याला २- ३ दिवसापूर्वी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते; मात्र त्यांची प्रकृती जास्तच बिघडली व बुधवारी रात्री १० वाजता त्यांच्यावर काळाने झडप घातली.

तूळजापूर येथील तरुण मुलगा कुत्र्याचा चावा घेतल्यामुळे व वेळेवर औषधोपचार न मिळाल्यामुळे मृत्यूच्या दाढेत सापडला या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गुरुवारी संदेशच्या पार्थिवावर अत्यंत शोकाकुल वातावरणात तुळजापूर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्याच्या मागे आई-वडील एक भाऊ व एक बहीण असा आप्त परिवार आहे. संदेश हा अत्यंत हुशार व मनमिळावू स्वभावाचा होता, त्यामुळे तो गेल्याने तुळजापूर येथील अनेकांच्या मनाला चटका लावणारी ही घटना आहे. यापूर्वी पातूर येथे सुद्धा एकाचा कुत्रा चावल्याने मुत्यु झाल्याची घटना घडली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News