ट्रम्पच्या मध्यस्थीने काश्मीर मुद्द्यावरून भारत -पाक तिढा सुटणार ?

सकाळ (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट
  • काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याची तयारी
  • भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मदत करण्याचा शब्द

वॉशिंग्टन : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आज ‘व्हाइट हाउस’मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन चर्चा केली.

काश्‍मीरप्रश्‍नी मध्यस्थी करण्याची तयारी ट्रम्प यांनी या वेळी दाखविल्याचे सांगण्यात आले. भारताबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी मदत करण्याचा शब्दही ट्रम्प यांनी या वेळी दिल्याचे अमेरिकेतील माध्यमांनी म्हटले आहे.

अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आवश्‍यक ती पावले उचलण्याचे आश्‍वासनही ट्रम्प यांनी दिले आहे. ‘व्हाइट हाउस’मध्ये आगमन झाल्यानंतर ट्रम्प यांनी खान यांचे स्वागत केले. ओव्हल ऑफिसमध्ये या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात आले. 

पंतप्रधानपदी निवड झाल्यानंतरचा खान यांचा हा पहिलाच अमेरिका दौरा आहे. खान यांच्यासोबत लष्करप्रमुख जनरल कमार जावेद बाज्वा, आयएसआयचे प्रमुख लेफ्टनंट जनरल फैझ हमीद आणि परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांच्यासह इतरांचा समावेश आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News