देवळा बाहेरचे खरे सत्य

शंभूराज पाटील
Tuesday, 4 June 2019

जोतीबाराजा पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य देवस्थान, आमचे कुळस्वामी, तस मला एवढं मंदिरातील गाभाऱ्यात कोंडून ठेवलेल्या देवाला पाया पडायची किंवा काही मागणं मागायची इच्छा होतच नाही. म्हणून मी कधी जास्त करून मंदिरात जात नाही. पण ३ वर्षे झाली आणि आज तो दिवस आलाच शेवटी.

जोतीबाराजा पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य देवस्थान, आमचे कुळस्वामी, तस मला एवढं मंदिरातील गाभाऱ्यात कोंडून ठेवलेल्या देवाला पाया पडायची किंवा काही मागणं मागायची इच्छा होतच नाही. म्हणून मी कधी जास्त करून मंदिरात जात नाही. पण ३ वर्षे झाली आणि आज तो दिवस आलाच शेवटी. आमचे सहकारी अजित सर यांच्या घराची देवाला तेल घालण्याची प्रथा जे नेहमी त्यांचे वडील पार पाडत होते ती जबाबदारी आज त्यांच्यावर आली. त्यांनी मला विचारले चला देवाला, तस मी फार इच्छूक नव्हतो, कारण एवढा प्रवास करून रांगेत उभे राहून घामाघूम होऊन पाहायला काय जायचं तर देवळातील देव, पण काही माहीत अचानक मनात आले आणि सर्व योगायोग जुळले व मला त्यांच्यासोबत जायची इच्छा झाली, आणि आम्ही निघालो. दुपारी 4च्या वाजण्याच्या दरम्यान आम्ही निघालो, जेव्हा सगळे देव दर्शन घेऊन गाय-म्हैशीची धारा काढायच्या आहेत, म्हणून गडबडीने दर्शन घेऊन घरी जायच्या तयारीत असतात. असा वेगळा वेळ आम्हाला देवाला जायला मिळाला. 

वारणा खोऱ्यात प्रवेश केला आणि एकदम 6 वर्षे हॉस्टेल ची या भागात घालवली होती, त्या सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. विध्यार्थी असताना जी शाळेबद्दल मनात भीती होती ती आज सर झाल्यावरसुद्धा जिवंत झाली, ते रस्ते तो साहित्य खरेदी करत असलेला वारणा बझार, सगळं जसंच्या तस, लहानपणी इच्छा असतानाही वस्तीगृहाच्या नियमामुळे काही घेता येत नव्हते आणि मोठे झाल्यावर बालपणीच्या सवयीमुळे घेता, येत असूनही आता इच्छा राहिली नाही. अस आलं, वारणा कॉलेज मधून मधला रस्ता धरून आम्ही केकले या गावात अजित सरांच्या बहिणीच्या घरी पोहचलो, मोठं घर होत. तिथे गेल्यावर 3 प्रकारचा नाश्ता पोट भरून केला. वाटलं रात्री आता जेवणाची काय गरज नाही, 6 वाजता आम्ही डोंगरावर गेलो.
 
मी का आलोय इथे नक्की हेच अजून मला समजले नव्हते, गाडी पार्क केली व जिथे देवाचे साहित्य खरेदी केले तिथेच चपला ठेवल्या,कारण ही एक अप्रत्यक्षरीत्या पे अँड पार्क अशीच योजना होती. चपला काढून चालायला लागल्यावर एक वेगळच भाव जाणवू लागला, त्या वातावरणात जिथे महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातुन सगळी माणसे काहीतरी इच्छा घेऊन आणि काही लोक सात्विक भावनेने इथे येऊन जात होते, त्या मातीवर पाय पडत असताना अस वाटत होते की या जोतीबावर चाललेली 4 पावले सुद्धा सम्पूर्ण महाराष्ट्र फिरून आल्याचा भास देणारी आहेत. शेवटी मी इकडे तिकडे बघत बघत मंदिरात प्रेवेश केलाच.

तेलाच्या बाटल्या होत्याच आमच्या दोघांच्या हातात. सरांना मी पुढे राहायला सांगितले कारण मी पहिल्यांदाच देवाला तेल घालायला आलो होतो, मनात एकदम आले की "मी जरी देवापासून दूर पळत असलो तरी देवाने काहीही कारणाने मला फक्त पायाच नाहींतर  सर्व दिव्यांना तेल घालायला भाग पाडले..त्याने त्याची सेवा माझ्याकडून शेवंतरी 6 करून घेतलीच.." सर्वात आधी आले नंदी. ठरल्यावप्रमाणे पुजारी नंदीच्या शेजारी त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. एक ताटात गुलाल व दुसऱ्या ताटात पैसेरुपी दक्षिणा, मी कधीही पैसे टाकत नाही देवाला म्हणून मी दुसऱ्या ताटाकडे दुर्लक्ष केले व त्या पुजाऱ्याने मला पाहून याला काय गुलाल लावून फायदा नाही. असा विचार करून बहुतेक त्यानेही माझ्याकडे दुर्लक्ष केले. सुरवातीलाच प्रत्यय आला की 'कायतरी द्या मगच कायतरी मिळेल.' ते दगडी बांधकाम जणू एखाद्या सोनेरी महालाला सुध्दा मागे सारेल असा, तो पायाला लागणार गुलाल जणू मखमलीची चादर असल्यासारखाच, मला वाटले जोतीबाराजा एवढ्या लवकर कसा काय आला, न जेव्हा वर नाव वाचले तेव्हा दिसले की हे कालभैरव आहेत..चांदीचे डोळे...मूर्तीच्या चेहऱ्यावरील दिसणारे रौद्रय रूप..अंगावर झगमगनारी कपडे, सार पाहून मनात एक वेगळीच शक्ती तयार होत होती. 

गर्दी कमी असल्यामुळे मला सर्व स्पष्ट पाहता आले. पुढे गेलो तर एक देवी. नक्की नाव आठवेना पण त्या मंदिराला दार बंद करून चक्क कुलूप लावले होते. मला काही समजतच नव्हते. देवीला गाभाऱ्यात कोंडून ठेवल्यासारख वाटलं.त्या देवीचा चेहऱ्यावर वेगळाच भाव होता..सोन्याने मांडलेली ती देवी सर्व काही असूनही चांदीच्या गाभाऱ्यात कैद होती. तेव्हा समजले सोनच्या पिंजऱ्यापेक्षा जास्त किंमत स्वातंत्र्याची असते, नंतर जोतिबा मंदिरात प्रवेश कराय चाललो, आल्यापासून देवाला पाहण्याची प्रतीक्षा आता संपणार व दर्शन मिळणार हा उत्साह वाढत गेला. 

बाहेर दोन पुजारी देवाची पालखी बांधत होते, व तिथेच त्यातील एकाच मुलगा त्यांच्या वडिलांना चेहऱ्यावर नाराजीचा सूर आणून बोलत होता, आ द्या की मला बांधायला.मला जमते, मागील वेळी बांधली होती मी आणि पुजारी बोलणार नाही रे ही गाठ वेगळी आहे. अशी नाही तशी बांधायची त्यांच्यामधील संवाद ऐकत ऐकत केव्हा जोतिबाच्या दाराजवळ आलो समजले नाही, ते पितळी आवरणाचे नक्षीदार कमान व त्यावर लहान गणपतीची मूर्ती. गुलालाने रंगलेले ती कमान. किततरी पाहण्यासारख्या गोष्टी, पण त्यापेक्षा ही जास्त नजरेत येणारी गोष्ट म्हणजे तिथे लावले वर्गणी चे पोस्टर ते देवपेक्षा जास्त नजरेत भरून दिसत होते. प्रवेश करतानाच पावती पुस्तक घेऊन बसलेला तो कर्मचारी देवळातील सगळं पावित्र्य घालवत होता. माझ्या मते मंदिराच्या बाहेर हे सर्व पाहिजे, देवळात फक्त देव आणि भक्त एवढेच हवे. देवाला ज्यांनी काही गोष्टी अर्पण केला त्यावरील त्यांची नावे पाहून वाटलं की इथेही स्वार्थ आहेच तर, लोकनेत्याची फोटो हे मंदिरात लावण्याचे स्थान नाही.त्यांच्यासाठी बाहेर आवारात काही करता आले समितीला तर अजून बर वाटेल. जाऊदे जास्त चांगले सांगू नये नाहीतर लोक मूर्ख बोलतील.

गाभाऱ्यात प्रवेश केला आणि कोपऱ्यात दोन गणेश मुर्त्या होत्या,तिथे दोन लहान मुले एकच वाक्य बोलत होते"आपल्या इच्छेनुसार दक्षिणा टाका, मला तर हसूच आले,आत्तापासून तयारी चालली आहे,म्हणजे आमच्या पुढील पिढीला देवाच्या दर्शन घ्यायचे असले तर मला वाटत ही पुजारी लोकांची पिढी मंदिराबाहेर टोलनाका लावाय पण कमी करणार नाही..आणि आम्ही अंध भक्त देवासाठी काहीही कराय तयार असणारे तेही काहीही प्रश्न न विचारता टोल भरू, पुढे गेलो आणि शेवटी दक्खनचा तो राजा दिसला.
 
काय त्याचे ते रूप चांदीचे डोळे,विठ्ठलाचे सुवर्णकर्ण सर्व अंग सुवर्णअलंकारांनी भरलेलं, शुभ्रपांढरे, पिळवसर वस्त्र खरेच राजा वाटत होता. पण देवाच्या पुढे 4 पुजारी, नीट देव दिसतच नव्हता. तेलांच्या पणत्या ओसंडून वाहत होत्या, गाभऱ्यातून तेलाचे डबे भरून पुजारी बाहेर नेत होते. 10 ते 15 फुटावर देव मध्ये आणि बाहेर दक्षिणापेटीच्या वर त्याचे पाय..काय विषयच समजून येत नव्हता मला. देव आत नंतर पुजारी नंतर देवाचे पाय आणि मग दक्षिणा पेटी. जास्त विचार न करता बाहेर आलो.जिथे होम असतो तिथे गेलो..तेथील अगरबत्तीचा धूर व उष्णतेने शरीराला एक वेगळीच ऊर्जा मिळत होती.

देवळातून बाहेर आलो व प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली..10 ते 12 मुलांचा ग्रुप पूर्ण काळे कपडे घातलेले जे मी ऐकले होते देवाला चालत नसतात ते हातात कॅमेरा घेऊन मंदिरासमोर फोटो काढत होते.एक असेही भक्त दिसले.प्रत्येक माणसाच्या चेऱ्यावर एक वेगळाच भाव होता दर्शन घेऊन आल्यावर..एक वेगळेच समाधान दिसत होते.

खाली यमाई मंदिरात गेलो.. तिथेही देवी 10 फूट दूरच, पण ज्याचा ओळखीचा पुजारी असेल तो थेट गाभाऱ्यात जाऊ शकतो..इथे स्त्रियांना बंदी होती बहुतेक पण पुरुष थेट गाभाऱ्यात जाऊ शकतो,तेही देवीच्या, असली प्रथा मनाला पटत नव्हती..मग कळले जस सरकारी कामाला मंत्र्यापेक्षा त्याचा पी.ए जास्त का महत्वाचा असतो ते.तस इथे देवपेक्षा पुजारी, अश्या पध्द्तीने जोतिबा दर्शन पूर्ण झाले.मला इथे देव कोठेच नाही दिसलं ना त्या भव्य गाभाऱ्यात ना त्या लोभस दिसणाऱ्या पाषाणी मूर्तीमध्ये पण इथले वातावरण पाहून अस वाटले की आपल्या मनातील जो देव आहे, जो स्पर्धेच्या युगात धावत आहे, सोशल जगात व्यस्त आहे, कंटाळून थकून झोपला आहे स्वतःला विसरून तो देव आज पुन्हा जागा झाला.अंतरात्मा पुन्हा नव्याने काहीतरी चांगले सुरू करण्याची साद घालू लागला.स्वतःला नेहमी प्रेरणा देण्यासाठी या ठिकाणी वरचेवर येत जा,अशी साद घालू लागला.

तेव्हा मला खर समजले की देव देवळात नव्हताच,तो तर मनात होता,देवळात जायचे कारण मनातील देव जागा करण्यासाठी.आज मी माझ्यामधील देव खऱ्या अर्थाने अनुभवला सोबत इतरांच्यातही दिसला.मला जोतिबा दर्शन घडवून आणणारे सर, गादी पार्क करून तेल व देवाचे साहित्य विकून गुजराण करणारा दुकानदार,पालखी बांधण्यात मग्न असून तो हक्क स्वतःच्या मुलाला न देणारा पुजारी व तेवढ्याच हक्काने ते काम करायला तयार असणारा त्यांचा मुलगा, आत दक्षिणा मागणारे लहान मुले व बाहेर भीक मागणारे दुर्दैवी भिकारी, फोटो काढत बिनदास्त फिरणारी नवी पिढीचे मुले पहिल्याच ओळखीत एकदम आपलीसी करणारी सरांची पाहुणे मंडळी, या सर्वांमध्ये एक माणूसकीचा देव दिसला ज्यांचे दर्शन घ्यायला, ना कोणत्या रांगेत उभे राहायला लागत होते ना कोणती पावती करायला लागत होती. यांना ओळखण्यासाठी पाहिजे ती फक्त निस्वार्थ नजर आणि मनात आदरभाव.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News