ट्रक-कारचा भीषण अपघात; एकाच गावातील 9 युवकांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोरजवळील कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर मध्यरात्री ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एकढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

पुणे : पुणे-सोलापूर रस्त्यावर लोणी काळभोरजवळील कदमवाक वस्ती ग्रामपंचायतीसमोर मध्यरात्री ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात कारमधील नऊ विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एकढा भीषण होता की कारचा चक्काचूर झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर रस्त्यावर कदमवाकवस्ती येथे दुभाजक ओलांडून आलेल्या इरटीका कारने ट्रकला धडक दिली. या अपघातात कारमधील 9 जण जागीच ठार झाले. कारमधील सर्वजण हे यवत (ता. दौंड) येथील रहिवाशी आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. पण, कारमधील सर्व नऊ जणांचा मृत्यू झाला होता. अपघातानंतर कारचा चक्काचूर झाल्याचे दिसत होते. 

हा अपघात शुक्रवारी ( ता. १९) रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी झाला. दोन जण गाडीत अडकले होते. त्यांना अग्निशमन दलाने बाहेर काढले.मृतांमध्ये अक्षय भारत वाईकर, विशाल सुभाष यादव, निखिल चंद्रकांत वाबळे, सोनू ऊर्फ नूर महंमद आशपाक अत्तार, परवेज आशपाक अत्तार, शुभम रामदास भिसे, अक्षय चंद्रकांत गिघे, दत्ता गणेश यादव व जुबेर अजित मुलाणी यांचा समावेश आहे. अपघातानंतर यवतवर शोककळा पसरली असून, पोलिस अधिक तपास करत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News