असे बनवा खजुराचे लाडू

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 10 June 2019

आरोग्यासाठी उपयूक्त असणारे खजूर आपल्या सगळ्यांनाच आवडतात पण त्याचे त्याचे लाडू कसे बनवतात, ते आपण जाणून घेऊ...

साहित्य 

  • अर्धा किलो सिडलेस खजुर किंवा आख्या खजुराच्या बिया काढून दिड ते दोन वाट्या सुक्या खोबर्‍याचा किस.
  • ५० ग्रॅम बदाम
  • २ छोटे चमचे खसखस
  • ३ चमचे तुप

कृती

  1. खजुराचे छोटे छोटे तुकडे करुन घ्या.
  2. बदाम कापुन घ्या. खसखस निवडून घ्या.
  3. खोबर्‍याचा किस मंद गॅसवर खरपुस भाजुन घ्या.
  4. आता भांड्यात तुप घालुन ते गरम झाले की खसखस घाला. मग त्यावर बाकिचे सगळे साहित्य म्हणजे खजुर, बदाम आणि भाजलेल खोबर घाला.
  5. आता हे सगळ मिश्रण ५ ते ७ मिनिटे म्हणजे चांगले गरम होईपर्यंत मिडीयम गॅसवर ठेवा. जास्त शिजवण्याची गरज नाही.
  6. भांडे खाली उतरवा व लाडू वळा. झाले लगेच तय्यार पौष्टीक, लज्जतदार, सोप्पे खजुराचे लाडू.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News