तंत्रनिकेतनचे 1,500 विद्यार्थी  घेणार थेट उद्योगात प्रशिक्षण 

YIN BUZZ TEAM
Thursday, 24 January 2019

औरंगाबाद : विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेचा विकास व्हावा आणि उद्योगांना कुशल मनुष्यबळ मिळावे, यासाठी जिल्ह्यातील तंत्रनिकेतनचा मराठवाडा असोसिएशन फॉर स्मॉल स्केल इंडस्ट्री ऍण्ड ऍग्रीकल्चर (मसिआ) सोबत सामंजस्य करार झाला आहे. याअंतर्गत पहिल्याच टप्प्यात 1455 विद्यार्थी थेट उद्योगात प्रशिक्षण घेणार आहेत. 

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने यावर्षीपासून तंत्रनिकेतनच्या अभ्यासक्रमात बदल केला असून, द्वितीय वर्षानंतर सहा आठवड्यांचे औद्योगिक प्रशिक्षण सक्‍तीचे केले आहे. याच्या अंमबजावणीसाठी हब आणि स्पोक मॉडेलची निर्मिती केली असून विभाग, जिल्हास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. औरंगाबाद जिल्ह्यासाठी छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेच्या (सीएसएमएसएस) तंत्रनिकेतन कॉलेजची निवड केली आहे. जिल्ह्यातील तंत्रनिकेतनचे विद्यार्थी आता मसिआमध्ये प्रशिक्षण घेणार आहेत. 
याप्रसंगी मसिआ आणि सीएसएमएसएस यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला. किशोर राठी आणि प्राचार्य गणेश डोंगरे यांनी स्वाक्षरी केली. यासाठी सागर आव्हाळे यांची उपस्थिती होती. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News