बोरिवलीत चक्क चार वर्षांच्या मुलीवर अत्याचार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 15 June 2019
  • तिच्याच चुलत्याने केला लैंगिक अत्याचार
  • या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट
  • तक्रारदार महिला राहते तिच्या कुटुंबीयांसोबत बोरिवली परिसरात

मुंबई : बोरिवली येथे चार वर्षांच्या पुतणीवर तिच्याच चुलत्याने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी दहिसर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद होताच आरोपी चुलत्याला पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर त्याला दिंडोशीतील सत्र न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. तक्रारदार महिला ही तिच्या कुटुंबीयांसोबत बोरिवली परिसरात राहते.

८ जूनला घरात कोणीही नसल्याने दीराने या चार वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. लघवीच्या जागेवर तिला दुखत असल्याचे तिने आईला सांगितले. त्यामुळे ती तिला घेऊन एका खासगी रुग्णालयात गेली होती. तिची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले. त्यानंतर मुलीच्या आईने दहिसर पोलिस ठाण्यात धाव घेत पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी दीराविरुद्ध लैंगिक अत्याचारासह बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News