कोल्हापूर देशात अव्वल; सर्वाधिक आयर्नमॅन असलेले एकमेव शहर

सुयोग घाटगे
Thursday, 25 July 2019
  • आयर्नमॅनचे आव्हान कोल्हापूर करांनी पूर्ण केले आहे. ते ही तब्बल 31 जणांनी.
  • कोल्हापूरचे हवामान आणि एकूणच भौगोलिक परिस्थिती आदर्शवत आहे.

कोल्हापूर:  शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा अंत पाहणारी स्पर्धा. एन मोक्याच्या क्षणी दमछाक करायला लावणारी स्पर्धा. आज जगभरातील सर्वात कठीण स्पर्धांमध्ये एक असणारी स्पर्धा म्हणजे आयर्न मॅन होय. या स्पर्धेमध्ये कोल्हापूरने आपला दबदबा कायम राखला आहे. सध्या या खेळ प्रकारातील सर्वाधिक आयर्नमॅन हे कोल्हापुरातील आहेत. संपूर्ण देशात असणाऱ्या आयर्नमॅन पैकी असणारी ही आकडेवारी सर्वाधिक आहे.   
  
आयर्न मॅन या नावातच स्पर्धेतील आव्हाने आणि ती पूर्ण करण्यासाठी असणारा खडतर रस्ता स्पष्ट होतो. आव्हान कितीही खडतर असावे आणि ते कोल्हापूर करांनी लीलया पूर्ण करावे हे जणू समीकरणच. असेच आयर्नमॅनचे आव्हान कोल्हापूर करांनी पूर्ण केले आहे. ते ही तब्बल 31 जणांनी. संपूर्ण देशात कोणत्याही शहरासाठीचा हा आकडा सर्वांत मोठा आहे. संपूर्ण भारतात इतके आयर्नमॅन किताब मिळवलेलं एका ठिकाणी नाही.
   
आयर्नमॅनसाठी सर्वात खडतर अशी तयारी करावी लागते. यासाठी कोल्हापूरचे हवामान आणि एकूणच भौगोलिक परिस्थिती आदर्शवत आहे. या ठिकाणी विदेशातील असणाऱ्या हवामानाशी साधर्म्य असणारे हवामान आढळून येते. या ठिकाणी सायकलिंगसाठी डोंगर, दरी, खाच खळग्याचे रस्ते आहेत. धावण्याच्या सरावासाठी देखील या रस्त्यांचा उपयोग होतो. 

शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी अशा आदर्शवत ठिकाणामुळे सराव अधिक चांगला होतो. लांब पल्ल्याच्या सायकलिंग सरावासाठी येथे लांबच लांब आणि चांगल्या दर्जाचे रस्ते देखील उपलब्ध आहेत. कोल्हापूर ते कर्नाटक राष्ट्रीय महामार्ग हा आदर्श ट्रॅक मानला जातो. जलतरण आव्हानांसाठी कोल्हापूर मध्ये नैसर्गिक देणगीच लाभली आहे. तलाव, नदीत  जलतरणपट्टु सराव करतात. हा फक्त शारीरिक क्षमता आजमावन्यासाठी असतो. सोबतच अनेक जलतरण तलाव देखील कोल्हापूर मध्ये उपलब्ध आहेत. अशा या पोषक वातावरणाचा फायदा येथील स्पर्धकांना सरावासाठी होतो. 

या आदर्शवत परिस्थीती आणि निसर्गदत्त देणगीमुळे सध्या असणारी 31 आयर्नमॅनची संख्या येत्या काही दिवसात आणखीन वाढणार असून यामुळे कोल्हापूरच्या लौकिकामध्ये नवा साज चढणार आहे.
  
काय आहे आयर्नमॅन स्पर्धा 

  • 40 वर्षांपूर्वी अमेरिकेतील हवाई कोना येथे सुरवात.
  • फक्त दहा स्पर्धकांचा सहभाग.
  • सध्या स्पर्धेत किमान दोन हजार स्पर्धकांचा सहभाग. 
  • भारतातील सर्वाधिक आयर्नमॅन कोल्हापुरात.
  • आयर्नमॅनची संख्या 31.
  • आणखीन 20 जण आयर्नमॅन होण्याच्या तयारीत.                                      

आदर्शवत वातावरण आणि कोल्हापूर मध्ये उपलब्ध असणाऱ्या सुविधा, यशाचे मुख्य कारण आहे. येथील हवामान आणि खाणे दोन्ही यासाठी उपयुक्त ठरते. तुलनेने तयारीसाठीची अधिकची मानसिकता हे कोल्हापूर करांचे अधिकचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. शिवाय इतर ठिकाणच्या तुलनेने येथील तयारीचा खर्च देखील कमी आहे. 
- वैभव बेळगावकर, 2 वेळा आयर्नमॅन स्पर्धेचा विेजेता. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News