आज ठरणार; सेमीफायनलमधल्या तीसऱ्या जागेचा दावेदार कोण? पाकिस्तानवर फास

सुरज पाटील
Wednesday, 3 July 2019

भारताविरुध्द सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने आपले वर्ल्ड कपमधले स्थान राखून ठेवले होते. आता त्याच इंग्लंडसमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान आहे. 

चेस्टरी ली स्ट्रीट - भारताविरुध्द सामना जिंकल्यानंतर इंग्लंडने आपले वर्ल्ड कपमधले स्थान राखून ठेवले होते. आता त्याच इंग्लंडसमोर न्यूझीलंडचे तगडे आव्हान आहे. 

आज इंग्लंड विरुध्द न्यूझीलंड असा सामना रंगणार आहे. दोन्ही संघ आपले वर्ल्ड कपमधील आव्हान टिकून ठेवण्यासाठी लढणार आहेत; मात्र या दोघांच्या लढतीत पाकिस्तान संघही डोके वर काढण्याचा प्रयत्न करेल, कारण जर या सामन्यात इंग्लंडला किंवा न्यूझीलंडला हार पत्करावी लागली आणि पाकिस्तानचा संघ येणारा सामना जिंकत असेल तर वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान आपलं स्थान निश्चित करेल.

वर्ल्ड कपच्या गुण तालिकेवर एकदा नजर टाकल्यास ऑस्ट्रेलिया, भारत या संघांनी सेमीफायनलसाठी आपलं स्थान निश्चित केलं आहे. वर्ल्डकपच्या सेमीफायनलमधील तिसऱ्या स्थानासाठी आज अतितटीचा सामना होणार आहे. ज्यात दोन्ही संघाना शेवटची संधी असेल.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News