आज होणार सुर्य ग्रहण, जाणुन घ्या काय होणार परिणाम

ऐश्वर्या जाधव (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

आज विषूवृत्तावर सुर्य, पृथ्वी आणि चंद्र एका रेषेत येणार असल्याने सूर्यग्रहणाचा योग आहे. भारतीय वेळेनुसार आज रात्री (२ जुलै) १० वाजून २५ मिनीटांनी सुरु होऊन उद्या (३ जुलै) पहाटे ३ वाजून २० मिनीटांपर्यंत राहील. या ग्रहणाचा काळ ४ तास ५५ मिनिटांचा असणार आहे. ज्योतीष शास्त्र नुसार मिथुन राशी आणि आद्र नक्षत्र या दरम्यान हे ग्रहण लागणार आहे. हे पूर्ण सूर्य ग्रहण असून भारतातील रहिवासी हे ग्रहण बघू शकणार नाहीत. 

सूर्य ग्रहण म्हणजे नेमकं काय?
जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये चंद्र येतो, त्यावेळेस सूर्य ग्रहण घडूण येते. दिवसाच्या वेळेस सुर्यग्रहणाचा योग आल्यास सुर्य पुर्णपणे नाहीसा होतो.

काय आहेत या सूर्य ग्रहणाची वैशिष्टे? 
हे ग्रहण पूर्ण सूर्य ग्रहण आहे. 
हे ग्रहण चिली,अर्जटिना, पॅसिफिक आणि दक्षिण अमेरीका या ठिकाणच्या नागरिकांना पाहाता येईल.
भारत तसेच भारताच्या आजूबाजूच्या देशांमध्ये हे ग्रहण दिसणार नाही.
उघड्या डोळ्यांनी हे ग्रहण पाहाता येणार नाही. 
या ग्रहणाचा परिणाम प्रत्येक राशीवर होऊ शकतो. 
सूर्य ग्रहाचा परिणाम हा कमीतकमी १५ दिवस प्रत्येक राशीवर असेल. 

कुठे दिसेल हे सूर्य ग्रहण
यावेळी अर्जटिना आणि चिली या दोन देशातच हे ग्रहण पूर्णपणे दिसणार आहे. ऊरग्वे, पराग्वे, इक्वाडोर आणि ब्राझील या देशांना याची झलक अंश रूपात दिसणार आहे. परंतु भारतात हे ग्रहण अजिबात दिसणार नाही. 

पुढील सूर्यग्रहण २०२० साली दिसण्याचा अंदाज शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पुढील वेळीसुद्धा या ग्रहाचा परिणाम हा अर्जटिन आणि चिली इथेच दिसणार आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News