आज तिला पुन्हा माझ्याकडे येऊ वाटतंय...

अभिनव बसवर
Wednesday, 12 June 2019

तिला एखादा पुरुष आवडला म्हणून माझ्या चारित्र्याचे धिंडवडे काढून गेलीच ना. तशीही जाऊ शकत होती. मी नसतं अडवलं. का अडवायचं ? तिचा माझ्यातला इंटरेस्ट संपला होता तर तिचं जाणं योग्यचं होतं.

असं काय घडलं, मी आजही तसाच आहे. ज्याला आयुष्यात काही जमणार नाही असं तिला वाटायचं तसाच. तेव्हा लाथाडून गेली. डोळ्यातल्या पाण्याला नाटकं म्हणाली. काय केलं होतं मी. थोडा वेळ मागितलेला, २० हजार कमवत होतो ना. नसेल घेता येत तिच्यासाठी ५ हजारचा सूट. प्रत्येक गरज नव्हती येत पुरी करता, पण मेहनत करत होतो न. घरात बसून तर नव्हतो. हातात पैसा नसला तरी डोळ्यात स्वप्नं होती माझ्याकडे.

तिला एखादा पुरुष आवडला म्हणून माझ्या चारित्र्याचे धिंडवडे काढून गेलीच ना. तशीही जाऊ शकत होती. मी नसतं अडवलं. का अडवायचं ? तिचा माझ्यातला इंटरेस्ट संपला होता तर तिचं जाणं योग्यचं होतं.

या प्रकरणापायी हातची नोकरी गेली. दुसरी शोधेपर्यंत सगळं सेव्हिंग संपत आलं. मित्रांकडे उसनवार्या करून कसा तरी जगलो. ती जिथे सोडून गेली तिथून फक्त अंधार दिसत होता. पै पै जोडून पुन्हा उभारलो. एकटाचं राहणं पसंद केलं. नकोच ते सगळं. बाई नको, प्रेम नको, भावनांचा गलिच्छ खेळ नको आणि पुन्हा तेच मरण नको.

माझ्यातला सगळाच ओलावा मी आतल्या आत आटवून टाकलाय. परिस्थिती माझ्याशी जितकी निर्दयीपणे वागली तितकंच या आयुष्याशी क्रूरपणे वागायचं ठरवलंय. कोणत्याही कोमल गोष्टीच्या प्रेमात पडायचं नाही. आहे ते खरबुड जगणचं चांगलंय. जगाने लाथाडल्यावर आज तिला माझी आठवण येतेय. मला तू हवी होतीस त्यांना तुझं शरीर. मी तुला कधीच बंधनात ठेवलं नाही. तुझं प्रत्येक स्वप्न पूरं करण्यासाठी धडपडत होतो. नव्हतं लागत हाताला यश. म्हणून मला सोडून जायचं राजा...?

राजा जेव्हा तुझी जास्त गरज होतीस तेव्हाच तू गेलीस. रडून रडून डोकं फुटायची वेळ आलेली. तू बरी आहेस ना हे पाहण्यासाठी तुझ्या त्या नवीन घराच्या बाहेर उभा राहायचो. वाटायचं तुला राग आला असेल. येशील परत. दुसर्यासाठी तुला नटलेलं पाहून पुन्हा मरायचो. स्वतःतल्या पुरुषावर थुंकायचो. बायकोच्या साध्या गरजा पुर्या करता नाही आल्या मला.

आज माझ्याकडे येऊन तुला काय मिळणार. बांधून घेऊन गेलेली स्वप्न पुन्हा इथे आणून नको सजवू. जीव घुसमटतो माझा. तुला काही गरज लागली तर मी नक्की तुझ्यासोबत असेन पण मला एकट्याला सोड. भीती वाटते आता, नाही होत हिंमत. पळपुटा म्हणालीस तरी चालेल. दार उघडायचं म्हणलं तरी हात थरथरतात. तो गंध पुन्हा नको, नकोच ते शरीर आणि आभासी आपुलकी

तू विस्कटून गेलेला संसार मी डस्टबिन मध्ये कधीचाचं फेकलाय. हे माझं अस्तित्व आहे. याच्या सीमा मी ठरवल्यात. तुला इथे नाही जागा पुरणार. खूप क्न्जेस्टेड केलंय मी इथल्या विटांना. तुझ्या स्वप्नांचं ओझं पुन्हा नाही पेलवणार इथल्या भिंतींना, ढासळून जाईल सगळं कायमचं.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News