आज रोहित वर्ल्ड कपमध्ये सचिनचे हे दोन मोठे रेकॉर्ड मोडणार? 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 9 July 2019

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा आजच्या सेमीफायनलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेत २००३ साली खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये ११ सामन्यांमध्ये ६१.१८ च्या सरासरीनं ६७३ रन केले होते. तर रोहितनं आतापर्यंत आठ सामनयात ९२.४२ च्या सरासरीनं ६४७ रन केले आहेत. आता मात्र रोहितला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ २७ रनची आवश्यकता आहे. 

पुणे : यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये दमदार फॉर्ममध्ये असलेला रोहित शर्मा आजच्या सेमीफायनलमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची शक्यता आहे. सचिन तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेत २००३ साली खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये ११ सामन्यांमध्ये ६१.१८ च्या सरासरीनं ६७३ रन केले होते. तर रोहितनं आतापर्यंत आठ सामनयात ९२.४२ च्या सरासरीनं ६४७ रन केले आहेत. आता मात्र रोहितला सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्यासाठी केवळ २७ रनची आवश्यकता आहे. 

सचिन तेंडुलकरनं दक्षिण आफ्रिकेत २००३ साली ६७३ रन केले होते. तेव्हापासून आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन करण्याचा रेकॉर्ड केवळ भारताच्या या दिग्गज बॅट्समनच्या नावावर दाखल आहे. तेंडुलकरनं तेव्हा आपल्या मागच्या रेकॉर्डमध्ये सुधारणा केली होती. सचिननं १९९६ मध्ये भारतात खेळण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये सात सामन्यात ५२३ रन केले होते. 

रोहितनं यंदाच्या टूर्नामेंटमध्ये आतापर्यंत पाच शतक झळकावले आहे. जो रोहितचा नवा रेकॉर्ड स्थापित झाला आहे. रोहित आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतक असलेल्या तेंडुलकरचा रेकॉर्ड मोडण्याच्या स्थितीत आहे. तेंडुलकरनं वर्ल्ड कपच्या ४५ सामन्यात सहा शतक आणि १५ अर्धशतक केले होते. असे हे दोन रेकॉर्ड आहेत जे गेल्या अनेक वर्षांपासून सचिनच्या नावावर आहेत. आज न्यूझीलंड सोबत असलेल्या सेमीफायनलच्या सामन्यात हे दोन रेकॉर्ड रोहितच्या नावावर जाऊ शकतात.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News