करिअरसाठी ‘यशाची गुरुकिल्ली’

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 8 June 2019
  • बारावी, पदवी, पदविका
  • विद्यार्थ्यांसाठी मोफत करिअरची दिशा
  • ‘सकाळ माध्यम समूह’, संजय घोडावत विद्यापीठातर्फे आयोजन

लातूर - दहावी, बारावी हा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. यानंतर पुढे काय, हा प्रश्‍न सर्वांसमोर असतो. अशावेळी तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन लाभले तर करिअरला नवी दिशा मिळते. निर्णय घेण्यासाठी योग्य मार्गदर्शनाची गरज असते. हे मार्गदर्शन संबंधित विषयातील तज्ज्ञांकडून मिळाले तर अधिक उपयुक्त ठरते. हे लक्षात घेऊन ‘सकाळ माध्यम समूह’ व संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूरतर्फे ‘यशाची गुरुकिल्ली’ ही करिअर मार्गदर्शन कार्यशाळेचे शनिवारी (ता. आठ) आयोजन करण्यात आले आहे. 

पदविका, बारावी, पदवीच्या विद्यार्थ्यांसह पालकांसाठी विशेष कार्यशाळा होणार आहे. त्यात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व वक्ते करिअर निवडीसंदर्भात मोफत मार्गदर्शन करतील. आत्मविश्‍वास कसा वाढवावा, उच्चशिक्षणातील विविध संधी, कोणते क्षेत्र करिअर म्हणून निवडावे, योग्य महाविद्यालय व विद्यापीठ कसे निवडावे, प्रवेश प्रक्रिया कशी असेल यासाठी काय तयारी करावी, स्वयंप्रोत्साहनाची तंत्रे आदी गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाईल. कार्यक्रमात विद्यार्थी व पालकांना तज्ज्ञ वक्‍त्यांकडून प्रेरणादायी विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. करिअरबाबतच्या त्यांच्या शंकांचे निरसनही केले जाणार आहे. 

संजय घोडावत विद्यापीठातर्फे प्रामुख्याने अभियांत्रिकी, आर्किटेक्‍चर, व्यवस्थापन, कला, विज्ञान, वाणिज्य या विभागांतर्गंत अभ्यासक्रम राबविले जातात. यामध्ये विद्यार्थ्यांची पदवी, पदव्युत्तर व पीएचडीपर्यंत पदवी संपादन करण्याची संधी उपलब्ध आहे. नाविन्याचा व गुणवत्तेचा ध्यास घेत घोडावत विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी गरजेचा असणाऱ्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानासोबतच विद्यापीठात कौशल्य शिक्षण मिळावे, यासाठी विद्यापीठात तज्ज्ञ व अनुभवी प्राध्यापकांकडून उपक्रमशील प्रयत्न सातत्याने केले जातात. जागतिक स्तरावर नावलौकिक मिळविलेल्या विद्यापीठातर्फे समाजाच्या उन्नतीसाठी विविध उपक्रम राबविले जातात. 

बारावीत उत्तुंग यश मिळविलेल्यांचा गौरव 
बारावीमध्ये ६० टक्‍क्‍यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा ‘सकाळ माध्यम समूह’ व ‘संजय घोडावत विद्यापीठा’तर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे. कार्यशाळेच्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रकाची छायांकीत प्रत घेऊन यावे. अधिक माहितीसाठी संपर्क विनोद बेलकुंडे ९८२२३९८७०० यांच्याकडे संपर्क साधावा.

  केव्हा - शनिवार  (ता. आठ जून)
  कोठे  - दयानंद सभागृह, लातूर. 
  कधी - सायंकाळी ४.३० वाजता 

मार्गदर्शक
संजय घोडावत ग्रुपचे डॉ. ए. डी. कातदारे, प्रा. अर्जुन पाटील.

कार्यशाळेची वैशिष्ट्ये 

  •   आत्मविश्‍वास वाढवा, स्वतःला घडवा
  •  बारावीनंतरच्या करिअरच्या संधी 
  • येणाऱ्या काळात शिक्षण क्षेत्रात होणारे बदल
  • राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील करिअरची विविध क्षेत्रे 
  • अंगभूत गुण, कौशल्ये व विद्यार्थ्यांचा कल यांचा विचार करून करिअरची निवड कशी करावी?
  • अभियांत्रिकी क्षेत्रातील संधी 
  • विद्यार्थी व पालकांचे शंका-निरसन 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News