अभिमानास्पद : भारतवंश बनल्या ब्रिटनच्या गृहमंत्री तर भारतपुत्र बनले खासदार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 25 July 2019

देशात विधानसभेचं वार वाहत असताना तिकडे सातासमुद्रापारदेखील भारतील वंशाने तसेच भारतपुत्राने ब्रिटनच्या राजकारणात दमदार प्रवेश केला आहे.

देशात विधानसभेचं वार वाहत असताना तिकडे सातासमुद्रापारदेखील भारतील वंशाने तसेच भारतपुत्राने ब्रिटनच्या राजकारणात दमदार प्रवेश केला आहे.

युनायटेड किंगडमचे नवे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या मंत्रीमंडळातीत भारतीय वंशाच्या प्रिती पटेल यांच्याकडे गृह मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.

वयाच्या वीसाव्या वर्षापासून त्या ब्रिटनमधल्या कॉन्झर्वेटिव्ह या राजकीय पक्षाच्या सदस्य आहेत, तर 2010 पासून ब्रिटनमधल्या विटहमच्या त्या खासदार आहेत.

अलोक शर्मा (खासदार, रीडिंग वेस्ट)

51 वर्षाच्या अलोक वर्मा यांचा जन्म भारतातला; मात्र वयाच्या पाचव्या वर्षापासून आई-वडिलांच्या व्यवसायामुळे ते ब्रिटनमध्ये स्थायिक आहेत. सध्या ब्रिटनमध्ये त्यांचा चार्टर्ड अकाउंटंटचा व्यवसाय आहे. 

शर्मा हे 2010 सालापासून रीडिंग वेस्ट या ठिकाणाचे खासदार आहेत, तर कॉन्झर्वेटिव्ह पक्षातून त्यांना नव्या मंत्रीपदापैकी एक मंत्रीपद बहाल करण्यात आले आहे.

ऋषी सुनक (चिफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी)0

भारतीय वंशाचे मात्र जन्म ब्रिटनमधला असलेले ऋषी सुनक हे ब्रिटनमधल्या रिचंडमधून खासदार आहेत. पेशाने वडील डॉक्टर, आई मेडिकल स्टोअर चालवते तर ऑक्सफर्डमधून शिक्षण घेतलेले ऋषी सध्या ब्रिटनमधल्या चिफ सेक्रेटरी टू द ट्रेझरी या पदाचे कामकाज पाहत आहेत.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News