पवित्र हक्कापासून वंचित राहू नये म्हणून...हा दिवस साजरा करतात

जयपाल गायकवाड
Friday, 25 January 2019

जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. कारण मतदारच आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात.

पुणे : भारताला स्‍वातंत्र्य मिळाल्यानंतर २५ जानेवारी १९५० रोजी एक स्‍वायत्त संस्‍था म्‍हणून निवडणूक आयोगाची स्‍थापना करण्यात आली. परंतु मागील काही निवडणुकीत मतदानाच्या टक्‍केवारीचे घटते प्रमाण लक्षात घेऊन २०११ पासून २५ जानेवारीला राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. 

जगातील सर्वात यशस्वी लोकशाही म्हणून आपल्या देशाकडे पाहिले जाते. ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजे मतदारांचा मोलाचा सहभाग आहे. भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. कारण मतदारच आपल्या मतदानाव्दारे लोकप्रतिनिधींची निवड करत असतात.

तत्‍कालिन राष्‍ट्रपती प्रतिभा देवीसिंह पाटील यांनी निवडणूक आयोगाच्या ६१ व्या स्‍थापनादिनी हा दिवस साजरा करण्याचा शुभारंभ केला होता. यंदा आठवा राष्‍ट्रीय मतदार दिवस साजरा केला जात आहे.
 
हा राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांच्या ठिकाणी, मतदार नोंदणी अधिकारी तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या स्तरावर साजरा करण्यांत येतो.  राष्ट्रीय मतदार दिनाच्या दिवशी मतदान केंद्राच्या ठिकाणी नव्याने नोंदणी झालेल्या सर्व मतदारांना निवडणूक छायाचित्र मतदार ओळखपत्र व बिल्ले समारंभपूर्वक देणे हा या मागचा मुख्य हेतू आहे.

वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर आपले नांव मतदार यादीत नोंदविणे आवश्यक आहे. कारण आपले नाव मतदार यादीत न नोंदविल्यामुळे संबंधित मतदार मतदानाच्या पवित्र हक्कापासून वंचित राहतात. मतदान करणे हा प्रत्येक नागरिकाचा पवित्र हक्क आहे. लोकशाही प्रबळ, मजबूत व भक्कम करण्यासाठी प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे.

मतदानाचे महत्त्व अधोरेखित करण्याचा दिवस असून मतदारयादीत आपले नाव नोंदवून घ्या, लक्षात ठेवा मतदान हा आपल्याला प्राप्त झालेला मुलभूत अधिकार आहे. ‬

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News