प्रवेश मुदतवाढीने विद्यार्थ्यांना दिलासा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 23 July 2019
  • अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदविकेच्या संस्था प्रवेशासाठी चार तासांची मुदतवाढ

औरंगाबाद - अभियांत्रिकी आणि औषधनिर्माण पदविकेसाठी संस्थेत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत अनुक्रमे २० जुलै आणि २१ जुलैला सायंकाळी पाच वाजताच संपली होती. गैरसमजातून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना सोमवारी  दुपारी चार ते रात्री आठ वाजेपर्यंत महाविद्यालयात प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली.

यामुळे राज्यभरातील शेकडो विद्यार्थ्यांवरचे संकट टळले आहे. प्रवेश अंतिम करण्याचा शेवटचा दिवस शनिवार आणि रविवार असल्याने संस्था म्हणजेच महाविद्यालये बंद असतील, असा अनेक विद्यार्थी, पालकांना गैरसमज झाला.महाविद्यालयात प्रवेशासाठी विद्यार्थी पोचले तेव्हा मुदत संपल्याचे त्यांना कळाले.

अडचण आलेल्या विद्यार्थ्यांनी थेट तंत्रशिक्षणच्या विभागीय केंद्रात धाव घेतली. तेथील अधिकाऱ्यांच्या कानावर ही गोष्ट घातली. तिथून मुंबईतील तंत्रशिक्षणच्या कार्यालयात कळविण्यात आले. तेव्हा सर्वच विभागांतून शेकडो विद्यार्थ्यांचे अर्ज आल्याचे कळले.

डीटीईतर्फे याची तत्काळ दखल घेत सोमवारी दुपारी चार वाजता संस्थास्तरावरील प्रवेशाची लिंक ओपन करण्याचा निर्णय घेण्यात आला. तंत्रशिक्षणच्या औरंगाबाद केंद्रात मराठवाड्यातून पंचवीसहून अधिक विद्यार्थी आले होते.

औरंगाबाद तंत्रशिक्षण विभागाकडे ज्या विद्यार्थ्यांनी याबाबत अर्ज केले होते, त्यांना फोनद्वारे, तर दुपारी तीननंतर आलेल्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सांगण्यात आले. तंत्रशिक्षणच्या संकेतस्थळावरदेखील अपडेट टाकण्यात आली होती.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News