'त्या' पिवळ्या साडीवाल्या महिलेचा टिक-टॉक व्हिडिओ वायरल 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

रिना द्विवेदी यांनी  सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन ही केलं होतं. त्यानंतर रीना यांचा एक टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान मतदान केंद्रावर पिवळ्या साडीतील निवडणूक अधिकारी रिना द्विवेदी सर्वांच्याच लक्षात राहिल्या. ईव्हीएम मशिन्स घेऊन जातानाचे त्यांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. लखनऊमध्ये राहत असलेल्या रिना द्विवेदी यांनी  सर्वांनी मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन ही केलं होतं. त्यानंतर रीना यांचा एक टिक टॉक व्हिडिओ व्हायरल झाल्यानं त्या आता पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

रिना व्दिवेदी यांचा सपनाचं 'तेरी आख्या का काजल' या गाण्यावर डान्स करताना एक टिक टॉक व्हिडिओ बनवला असून सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये रिना हिरव्या साडीमध्ये सपना चौधरीप्रमाणं डान्स स्टेप करताना दिसत आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर  पसंती मिळत आहे. हा व्हिडिओ कोणत्यातरी लग्नात शूट करण्यात आला आहे. ज्यामध्ये रिना कोणत्याही अभिनेत्री पेक्षा कमी दिसत नाही. या व्हिडिओमध्ये रिना यांनी सपनापेक्षाही चांगला डान्स केल्याचं काहींचं म्हणणं आहे.

कोण आहे रिना द्विवेदी
लोकसभा निवडणुकीत वायरल झालेल्या फोटोमुळे रिना द्विवेदी या देशभरात प्रसिद्ध झाल्या आहेत. त्या सार्वजनिक बांधकाम विभागात अधिकारी असून सोशल मीडियावर त्यांचे लाखो फॉलोअर्स आहेत. त्यांना भोजपुरी चित्रपटाच्या ऑफर्स देखील आल्या होत्या. पतीच्या मृत्यूनंतर मुलाच्या जबाबदारीमुळे त्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स नाकारल्या, पण, बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास स्वीकारणार असल्याचं रिना सांगतात. लहानपणापासून त्यांना फिटनेस आवडतो. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News