यूपीत गुंडांचा जेलमधून पिस्तूलसोबत tiktok व्हिडीओ, थेट योगींना इशारा

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 27 June 2019

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गेले काही दिवस यूपीतल्या सर्व गुन्हेगारांच्या विरुध्द आवाज उठवण्यास सुरू केली आहे; मात्र कदाचित योगी आदित्यनाथ यांना ही गोष्ट नसेल माहिती की ज्या गुन्हेगारांना ते तुरूंगात पाठवत आहेत, ते गुन्हेगार आता तुरूंगात देखील स्वत:चा ताबा धरून बसले आहेत, त्यातलाच एक प्रकार म्हणजे यूपीतल्या उन्नाव तुरूंगातून व्हायरल होत असलेला एक tiktok व्हिडीओ.

यूपीतले भलेभले कैदी ज्या तुरूंगाची हवा खातात ते म्हणजे उन्नाव तुरूंग. याच तुरूंगात सध्या धरपकड सुरू असलेल्या कैदींना डांबण्याचं काम सुरू आहे, मात्र तुरूंग असो वा घर, हम नही सुधरेंगे अशा भाषेत गुन्हेगारांनी चक्क योगींनाच टोला लगावला असल्याचे पाहायला मिळते.

काही दिवसांपासून व्हायरल होत असणारे हे चार गुन्हेगारांचे व्हिडीओ सध्या यूपी नाहीतर देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. पहिल्या व्हिडीओमध्ये तुरूंगाच्या कोठडीच्या बाहेर एक कैदी बोलतो की 'ये योगी सरकार हमारा ना मेरठ जेल में बिगाड पाई, अशा शब्दात योगी आदित्यनाथ तसेच योगी सरकारची खिल्ली उडवताना दिसत आहेत, त्यामुळे योगी सरकारने सुरू केलेल्या आरोपींना पकडण्याच्या मोहिमेचा गुंडाना काहीच फरक पडत नसल्याचे पाहायला मिळत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News