‘टायगर जिंदा है' मध्य प्रदेशात देशातील सर्वाधिक ५२६ वाघ; महाराष्ट्रात वाघ किती?

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Monday, 29 July 2019

नवी दिल्ली : जगात भारत वाघांसाठी सर्वाधिक सुरक्षित ठिकाण आहे. आज जागतिक व्याघ्रदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खूशखबर दिली आहे. देशात आता एकूण २ हजार ९६७ वाघ आहेत. देशातील वाघांच्या संख्येत वाढ झाली असल्याची माहिती मोदींनी दिली आहे. यापूर्वी २०१४ च्या अहवालानुसार देशात १७०६ वाघ होते.

विशेष म्हणजे महाराष्ट्रातही वाघांच्या संख्येत वाढ झाली आहे. २०१९  मध्ये २५० पेक्षा अधिक वाघांची संख्या महाराष्ट्रात झाली आहे. २००६ मध्ये १०३, २०१० मध्ये १६९, २०१४ मध्ये १९० वाघांची संख्या महाराष्ट्रात होती.तसेच तामिळनाडूमधील सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पाला सर्वोत्कृष्ट म्हणून त्याला पुरस्कार देण्यात आला आहे.   

मध्य प्रदेशात देशातील सर्वाधिक ५२६ वाघ असून मध्य प्रदेशने पुन्हा एकदा अव्वल क्रमांक मिळवला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर ५२४ वाघांसह कर्नाटक आहे. तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड आहे. उत्तराखंडमध्ये ४४२ वाघ आहेत.

‘एक था टायगर’पासून सुरु झालेला प्रवास ‘टायगर जिंदा है’ पर्यंत पोहोचला आहे. हा प्रवास इथेच थांबता कामा नये अशी अपेक्षा मोदींनी ट्विटवर ट्विट करत व्यक्त केली आहे<

>

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News