TIKTOK आणि HALO अॅपवर नखरे करणाऱ्यांनो, अॅप होणार पुन्हा बंद, राज्यसभेत मुद्दा गाजला

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 18 July 2019

सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुध्द सुर असलेल्या देशद्रोही कटकारस्तानमध्ये सामिल असल्याचा संशय आहे.

सोशल मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय असणाऱ्या TIKTOK आणि HALO अॅपला भारतीय सरकारने पुन्हा नोटीस बजावल्या आहेत. सरकारच्या मते दोन्ही अॅप देशाच्या विरुध्द सुर असलेल्या देशद्रोही कटकारस्तानमध्ये सामिल असल्याचा संशय आहे.

सरकारने सुरू असलेल्या राज्यसभेत हा विषय मांडला असून, दोन्ही अॅपला 21 प्रश्नांची नोटीस पाठवली आहे आणि त्यांच्याकडून उत्तरे मागितली आहेत, त्याचबरोबर जर संबंधित प्रश्नांची समाधानकारक उत्तरे दोन्ही अॅप कंपनीकडून मिळाली नाहीत, तर देशात दोन्ही अॅप लवकरात लवकर बंद होणार असल्याची माहिती देखील राज्यसभेत सरकारकडून देण्यात आली.

स्वदेशी जागरण मंचने केलेल्या आरोपानुसार TIKTOK आणि HALO हे दोन्ही अॅप अॅंटी नॅशनल अॅक्टिविटीजना सक्रिय करत आहेत. TIKTOK अॅपवर याआधीही असे आरोप लावण्यात आले होते. काही वेळासाठी त्याला बंदही करण्यात आले होते.

TIKTOK आणि HALO अॅप यांनी दिलेली प्रतिक्रिया...
आम्ही भारतीय सरकारला पुर्णपणे सहकार्य करण्यासाठी तयार आहोत आणि ती आमची जबाबदारी असेल. भारतात TIKTOK आणि HALO अॅपला पुढे घेऊन जाण्यासाठी पुढील तीन वर्षांत एक बिलीयन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News