टिक टॉक व्हिडिओमुळे पुन्हा तरुण आले अडचणीत ; पाहा काय आहे व्हिडिओ

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 19 June 2019

टिक टॉक सुरू झाल्यापासून टिक टॉकबाबत अनेक बातम्या समोर आल्या. बहुतेक लोकांना प्रसिद्धीही मिळाली, पण याच प्रसिद्धीमुळे बहुतेकांना अडचणींना सामोरे जावे लागले आहे. टिक टॉक व्हिडीओ बनवताना त्या व्हिडीओमुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या नाही पाहिजेत, याचे भान न ठेवता काही जण व्हिडीओ बनवतात. 

असाच एक व्हिडीओ सध्या खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन मुले आणि एक मुलगी आहे. त्यांनी एका डायलॉगवर हा व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये असा डायलॉग आहे की, "तू म्हणतोस ना पुण्यावरनं आला, मग आम्ही काय अलिबागवरुन आलो आहे का"? पण या व्हिडीओमध्ये त्यांनी काही अपशब्द (शिविगाळ) वापरले आहे. यामुळेच काही लोकांची मने दुखावली गेलीत. 

हे तिन्ही तरुण पुणे शहरातील आहेत. 

यामुळे काही जणांनी यांना फोन करून चांगला धडा शिकवला आहे. त्यांना नीट समजून देखील सांगितले आहे. तसेच त्यांना जाहीर माफी देखील मागायला लावली आहे.

आता त्यांचा माफी मागीतल्याचा व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे. हे प्रकारण इथेच थांबले नाही. या तिघांवर गुन्हा दाखल केल्याची माहिती समोर येत आहे.

या एका व्हिडीओमुळे हे तिन्ही पुणे शहरातील तरुण अडचणीत आले आहेत. पुणे शहरातील हे तरुण यांना या व्हिडिओमुळे माफी मागावी लागली आहे. त्यांनी असे देखील सांगितले आहे, की आम्ही हा व्हिडिओ कोणाच्या भावना दुखावण्याच्या उद्देशाने तयार केला नसल्याचे सांगितले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News