लवकरच येतोय 'टिक टॉक'चा स्मार्टफोन

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 21 June 2019
  • कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही

मुंबई : 'टिक टॉक'  अपची भारतात मोठ्या प्रमाणात क्रेझ वाढत आहे. भारतात 2019 पर्यंत 9 कोटी लोक टिकटॉक अ‍ॅप वापरत असल्याची माहिती पुढे आली आहे. टिकटॉक युसर्स दिवसेंदिवस वाढत आहेत यामुळे टिकटॉक अॅप बनवणाऱ्या चीनच्या ByteDance या कंपनीने आता स्मार्टफोन क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

'टिक टॉक'चा स्मार्टफोन बाजारात येणार असून भारतातील स्मार्टफोन कंपन्यांना टक्कर देणार आहे. टिकटॉक अॅप हे चीनच्या ByteDance या कंपनीच्या मालकीचे असून या फोनमध्ये टिक टॉक अॅपसह ByteDance कंपनीचे इतर अॅप प्रिलोडेड असणार आहेत.

या फोनची किंमत टिक टॉक अॅप वापरणाऱ्या लोकांचा विचार करुन ठरवण्यात येणार आहे. कंपनीकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. टिक टॉक अॅप वापरणे हे अनेकांच्या मृत्यूचे कारणही बनले आहे. तसेच या माध्यमातून अनेकांना प्रसिद्धी ही मिळाली. भारतातील स्मार्टफोन कंपन्यांना टिक टॉकचा हा नवा फोन टक्कर देणार आहे का हे पाहावं लागेल.  

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News