प्रो कबड्डी लीगचा थरार आजपासून मराठीमध्ये !

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 20 July 2019
  • स्टार स्पोर्ट्स वाहिनीने स्टार स्पोर्ट्स १ मराठी वाहिनी केली लाँन्च 
  • आता क्रीडाप्रेमींना मराठीमधून मिळणार प्रो कबड्डीची मेजवानी 

हैदराबाद : विश्‍वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार संपून काही दिवस होत नाहीत तोच भारतीय क्रीडाप्रेमींना प्रो कबड्डीची मेजवानी मिळणार आहे. कर्णधारांत आशियाई विजेता इराण ताकद दाखवत असताना सर्व संघांची मदार आता नवोदित खेळाडूंवर असणार हे निश्‍चित झाले आहे.

यंदाचा हा सातवा मोसम आहे. गतस्पर्धेपासून प्रो कबड्डीची पिढी बदलली. अनुप कुमार निवृत्त होत असताना सिद्धार्थ देसाई, नितेश कुमार अशा प्रथमच खेळणाऱ्या खेळाडूंचा उदय झाला. अनेक नवे खेळाडू चमक दाखवू लागले. त्यामुळे यंदा अजय ठाकूर, राहुल चौधरी असे जुने खेळाडू असले तरी नवी पिढी त्यांच्याशी पंगा घेण्यास सज्ज आहे. 

या स्पर्धेसाठी आज सर्व कर्णधार आणि प्रशिक्षक आमने सामने आले. यात यू मुम्बाचा फझल अत्राचली आणि तेलगू टायटन्सचा अबोझर हे इराणचे खेळाडू कर्णधार होते; तर ४० वर्षीय चेर्लाथन हरियानाचा आणि २० वर्षीय नितेश कुमार युपी योद्धाचा कर्णधार होता. 

प्रो कबड्डीतील बाहुबली म्हणून ओळख निर्माण केलेला सिद्धार्थ देसाई गत मोसमात यू मुम्बातून खेळला होता. यंदा त्याला एक कोटी ४५ लाखांची किंमत देत तेलगूने घेतले. संपूर्ण स्पर्धेत यंदा तो कशी कामगिरी करतो, याकडे लक्ष असलेच; परंतु सलामीला त्याच्यासमोर मुंबईचे आव्हान असेल. सिद्धार्थ आमचा खेळ जाणतो, तर आम्ही त्याचा. त्यामुळे हा सामना रंगतदार असेल, असे मुंबईचा कर्णधार फझलने सांगितले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News