लोणावळा येथे ‘केटीएम स्टंट शो’चा थरार
लोणावळा: के टीएम या युरोपातील दिग्गज अशा रेसिंग ब्रॅडतर्फे लोणावळा येथे नुकतेच ‘केटीएम स्टंट शो’चे आयोजन केले होते. व्यावसायिक स्टंट कलाकारांकडून लोकांना चांगले स्टंट्स पहायला मिळावेत, या उद्देशाने या शोचे आयोजन करण्यात आले होते.
सर्वांसाठी खुल्या असलेल्या या शोचे आयोजन लोणवळ्याच्या जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील स्क्वेअर मॉल येथे करण्यात आले होते. यामध्ये व्यावसायिक अशा स्टंट टीमतर्फे श्वास रोखून धरणाऱ्या चित्तथरारक स्टंट्सने आपली कला ही केटीएम ड्यूक बाईक्सच्या माध्यमातून दाखवली.

बजाज ऑटो लिमिटेडच्या प्रो बायकिंगचे उपाध्यक्ष सुमित नारंग यांनी सांगितले, की केटीएम हा ब्रॅन्ड हायपरफॉर्मन्स रेसिंग बाईक म्हणून प्रसिद्ध आहे. म्हणून आम्ही आमच्या ग्राहकांना नेहमीच केटीएम बाईक देत असलेल्या साहस आणि उत्साहाचा अनुभव आमच्या ग्राहकांना उपलब्ध करून देत आहोत.
व्यावसायिक स्टंट्सचे हे कार्यक्रम विविध शहरांत होणार असून भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित करणार आहोत. केटीएम हा एक्स्कुझिव्ह असा प्रीमियम ब्रॅण्ड असून यामुळे आम्ही आमच्या ग्राहकांना अनोखा अनुभव देण्यास उत्सुक आहोत.