बदनापूर मतदार संघात तिरंगी लढत  

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 11 June 2019
  • अंबड, बदनापूर आणि भोकरदन या तीन तालुक्याचा मिळुन बदनापूर विधानसभा मतदारसंघ बनला आहे.
  • बदनापूर विधानसभा मतदार संघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे.
  • ​या मतदार संघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार नारायण कुचे आहेत.

जालना: बदनापूर विधानसभा मतदारसंघ भलामोठा विस्तारलेला आहे. अंबड, बदनापूर आणि भोकरदन या तीन तालुक्याचा मिळुन बदनापूर विधानसभा मतदारसंघ बनला आहे. बदनापूर विधानसभा मतदार संघ अनुसुचित जातीसाठी राखीव आहे. हा मतदारसंघ युती़च्या सेनेकडे आहे. मात्र गेल्या वर्षी युती न झाल्याने भाजपचे आमदार नारायण कुचे विजयी झाले होते. त्यामुळे या जागेवर शिवसेना दावा करू शकते.

या मतदार संघात भाजपच्या वतीने विद्यमान आमदार नारायण कुचे, राष्ट्रवादी कॅाग्रेसच्या वतीने बबलू चौधरी, बाबासाहेब सोनवणे, सुरेश खंडागळे इच्छुक आहेत. शिवसेनेच्या वतीने माजी आमदार संतोष सांबरे, जगन दुर्गे. डॅा. दिलीप अर्जुने इच्छुक आहेत. यापूर्वीही त्यांनी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न केले होते. वंचित आघाडीतर्फे ऐनवेळी या मतदारसंघात उमेदवार दिल्या जाऊ शकतो. तर मनसेच्या वतीने अमोल दाभाडे आणि अॅड. मोहन तायडे इच्छुक आहेत.

स्वतंत्र कार्यकर्त्यांची मोर्चेबाधणी चालू आहे. बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांनी स्वबळावर निवडणुत लढवण्याची तयारी सुरु आहे. राजकारणाच्या चर्चा मतदारसंघात रंगत आहेत. मतदारसंघात निवडणुत स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जय्यत तयारी सुरू केली आहे. इतके दिवस जिल्ह्यातील राजकारणात त्यांच्या होणाऱ्या कुचंबनेवर कुरघोडी करण्याचा निर्णय घेऊन स्वतंत्र कार्यकर्त्यांची एक फळी मतदारसंघात उभी केली जात आहे. विधानसभेची निवडणूक पूर्णपणे स्वबळावर लढण्याच्या त्यांच्या योजनांच्या राजकारणाच्या चर्चा मतदारसंघात रंगत आहेत.
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News