करिना घेणार एका एपिसोडचे तीन कोटी

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 17 July 2019
  • ‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘डान्स इंडिया डान्स’ या रिॲलिटी शोच्या परीक्षकपदाची धुरा करिना कपूर खान सांभाळत आहे.

‘झी टीव्ही’ वाहिनीवरील ‘डान्स इंडिया डान्स’ या रिॲलिटी शोच्या परीक्षकपदाची धुरा करिना कपूर खान सांभाळत आहे. सूत्रांनी दिलेल्या  माहितीनुसार, या शोच्या एका एपिसोडसाठी ती तब्बल ३ कोटी रुपये घेत आहे.

शिवाय टेलिव्हिजन विश्‍वात सर्वाधिक मानधन घेणाऱ्यांच्या यादीमध्ये करिना सरस ठरली आहे. ‘मी बरीच वर्षं चित्रपटसृष्टीमध्ये काम केल्यानंतर छोट्या पडद्याकडे वळले आहे. त्यामुळे आठ तास काम केल्यानंतर मला मिळणारं मानधन बरोबरच आहे,’ असे मध्यंतरी एका मुलाखतीत करिनाने म्हटले होते. पण करिनाचे हे मानधन ऐकून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News