क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या तिघा खेळाडूंची निवड

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 30 June 2019

बंगळूर येथे होणाऱ्या एस. ए. श्रीनिवास स्मृतिचषक राज्यस्तरीय आंतरविभागीय २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या तिघा खेळाडूंची निवड झाली आहे.

बेळगाव - बंगळूर येथे होणाऱ्या एस. ए. श्रीनिवास स्मृतिचषक राज्यस्तरीय आंतरविभागीय २३ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी बेळगावच्या तिघा खेळाडूंची निवड झाली आहे. स्वप्नील येळवे, अंगदराज हिट्टलमनी, विजय पाटील हे तिघे बंगळूरच्या मोफुसील क्‍लब संघातून खेळणार आहेत.

या मौफुसील क्‍लब संघात निकीन जोस (कर्णधार), परिक्षित शेट्टी, स्वप्नील येळवे, विजय पाटील, अंगदराज हिट्टलमनी, विष्णू प्रियान, चेतन एल. आर., निश्‍चित राव, सुशीलकुमार, व्ही. केवेरप्पा, शशांक के., माधव बजाज, अर्जुन पाटील, राम भुतानी यांचा समावेश आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News