११ हजार विद्यार्थी अनुभवणार ‘उरी’चा थरार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Friday, 26 July 2019
  • कारगिल दिनानिमित्त जिल्ह्यात २५ चित्रपटगृहांत एकाच वेळी सिनेमा प्रदर्शित

कोल्हापूर - देश सेवा करणाऱ्या सैन्यांबद्दल युवकांत कर्तव्य भावना आणि अभिमान वाढावा, देशहितासाठी तरुणांनी अग्रेसर राहिले पाहिजे, यासाठी शुक्रवार कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शालेय तसेच महाविद्यालयीन ११ हजार विद्यार्थ्यांना ‘उरी-द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट दाखवला जाणार आहे.

यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा करमणूक अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील २५ चित्रपटगृहांत हे नियोजन केले आहे. 
सकाळी १० वाजता एकाच वेळी सर्व चित्रपटगृहांत हा सिनेमा प्रदर्शित केला जाणार आहे. ‘उरी’ चित्रपट दाखविण्यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर शहर व जिल्ह्यातील सर्व चित्रपट गृहचालक आणि मालकांची संयुक्त बैठक झाली होती. त्यानुसार याचे नियोजन केले आहे. उद्या प्रत्येक चित्रपटगृहात स्वातंत्र सैनिक किंवा माजी सैनिकांच्या हस्ते या चित्रपट खेळाचे उद्‌घाटन केले जाणार आहे.

शहरातील सरस्वती, उर्मिला, पार्वती, आयनॉक्‍स, पी. व्ही. आर, पद्मा, शाहू, रॉयल, प्रभात, गणेश चित्र मंदिर गांधीनगर इचलकरंजी येथील भाग्यरेखा, फॉर्च्युन, राधाकृष्ण, गूरू, कल्पना, पंचवटी, हिरा (हुपरी). जयसिंगपूर येथील झेले, न्यु विक्रम, गडहिंग्लजमध्ये सुभाष, मराठा, कुरूंदवाड येथे राघवेंद्र, गारगोटीमध्ये हिरा, पेठ वडगाव येथे श्रीराम आणि राजाराम  या चित्रपट गृहामध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.  यात ११ हजार ९ प्रेक्षकांची सोय करण्यात आली आहे. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News