एकाच जागी बसून राहणाऱ्यांना 'हा' गंभीर आजार होऊ शकतो

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

ऑफिसमध्ये गेल्यावर एकदा कॉम्प्युटरवर काम सुरु केलं की, तासनतास आपण जागेवरुन उठत नाही. काही जण तर ऑफिसमधून घरी गेल्यावर सुद्धा टीव्ही किंवा स्मार्टफोनवर गुंतलेले असतात. या सर्व गोष्टीमुळे आपल्या शरीराची हालचाल होत नाही. शरीराची हालचाल न झाल्याने अनेकांना मधुमेहासारखा गंभीर आजार होऊ शकतो. अमेरिकेतील मेयो क्लिनीकने याबाबतच एक अहवाल प्रसिद्ध केला आहे.

मेयो क्लीनिकने दिलेल्या अहवालानुसार, शरीराची हालचाल न झाल्याने माणसाला गंभीर आजार होऊ शकतात. बदलत्या जीवनशैलीमुळे लोक चालणे-फिरणे, व्यायाम करणे या गोष्टींना महत्त्व देत नाहीत. मात्र यामुळे लोकांना पाठीचे, हात किंवा पायाचे, किंवा कंबरेचे आजार होऊ शकतात.

तासनतास ऑफिसमध्ये बसण्याची सवय मोडण्यासाठी हे करा

तहान लागल्यानंतर बॉटलमधून पाणी पिण्यापेक्षा जागेवरुन उठून पाणी पिण्यास जा
दर अर्धा तासांनी जागेवर उभे राहून बॉडी स्ट्रेच करावी
ऑफिसमध्ये एखाद्या मित्राकडे काम असल्यास, त्याला फोनवरुन संपर्क साधण्यापेक्षा त्याच्या जागेवर जाऊन ते काम सांगा
एका जागेवर बसून जेवण्यापेक्षा डबा घेऊन कॅटीनमध्ये जा
ऑफिसमध्ये जाताना लिफ्टचा वापर टाळा, त्याऐवजी जिन्यांचा वापर करा
ऑफिसमध्ये ब्रेकदरम्यान फिरताना फोनवर बोला

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News