ज्यांच्यामुळे पावसाने मुंबईकरांची वाट रोखली, त्यांचीच वाट पावसाने रोखली

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 2 July 2019

मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना ही बसला.वांद्रे येथील कलानगर परीसरात पाणी साचल्याने आदित्य ठाकरे यांना मातोश्री च्या बाहेर पडता आलं नाही.

मुंबई : मुंबईत मुसळधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना ही बसला.वांद्रे येथील कलानगर परीसरात पाणी साचल्याने आदित्य ठाकरे यांना मातोश्री च्या बाहेर पडता आलं नाही.

आदित्य ठाकरे यांना पालिकेच्या आपात्कालीन कक्षात येऊन मुंबईतील एकूण पावसाळी परिस्थितीचा आढावा घ्यायचा होता.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कक्षाला भेट देऊन मुंबईतील पावसाळी परिस्थितीचा आढावा घेतला.याचवेळी आदित्य ठाकरे यांना देखील कक्षात यायचं होतं.अखेर मुख्यमंत्र्यांनी काही काळ आदित्य यांची वाट ही पाहिली,मात्र आदित्य न आल्याने मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि ते निघून गेले.

रात्रभर कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मातोश्री परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने मातोश्री परीसरातील वाहन इतरत्र हलवल्याने आदित्य यांना वेळेवर येता आले नाही.शेवटी आदित्य यांना घेण्यासाठी काही नगरसेवक मातोश्री बाहेर पोहोचल्यानंतर त्यांच्या मदतीने आदित्य उशिरा पालिकेच्या आपत्कालीन कक्षात पोहोचले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News