कॉलेजच्या 'त्या' आठवणी

विवेक वैद्य
Tuesday, 6 August 2019

पावसाळा असल्याने लागलेला पाण्याचा ओढा अगदी प्रसन्न वातावरण आणि सुखकर प्रवास. मी मित्राकडे केव्हा पोहचलो समजलेच नाही.

खूप वर्षापूर्वी माझा एक शाळेतला मित्र गावापासून ८-१०किलोमीटरवर राहायचा. त्याच्या गावाला जायला दोन रस्ते होते. एक थोडा जवळचा पण तो जंगलातून जाणारा कच्चा दुसरा थोडा फेर्याचा पण पक्का आणि सेफ. मित्र नेहमी लांबच्या रस्त्याने यायाचा. आम्हीही त्याच्या गावाकडं गेलो तर त्याच रस्त्याने जायचो. क्वचीतच जंगलच्या रस्त्याने कॉलेजला जायचो. हातात मोटरसायकल आली तरीही रस्ता तोच राहीला. या रस्त्यावर रहदारीही खूप असायची पुढे नोकरी धंद्याने वेगळे झालो. गाव सुटले.

एकदा खूप वर्षांनी त्याला भेटायला निघालो आणि जाणूनबुजून मोटरसायकल जंगलच्या रस्त्याने टाकली. आणि थोडे अंतर गेल्यावरच फरक जाणवला. हा रोडही चकाचक डांबरी झालेला. आजूबाजूला मस्त झाडी लावलेली.

गावाच्या बाहेर हौशी माणसांनी बांधलेली टुमदार घर. रस्ता फारसा माहितीतला नसल्यामुळे कमी रहदारी. पावसाळा असल्याने लागलेला पाण्याचा ओढा अगदी प्रसन्न वातावरण आणि सुखकर प्रवास. मी मित्राकडे केव्हा पोहचलो समजलेच नाही.

एखादे सुंदर स्वप्न संपावे तसे वाटले. पोहचल्या पोहचल्याच त्याला या रस्त्याच्या बदलाबद्दल विचारले "अरे हा कधीचाच झालाय,पण लोकांना तोच अंगवळणी पडला म्हणून इकडून फारसे कोणी येतच नाही..."

मी म्हटलं "खरय रे. रस्त्याबद्दल म्हणा,जीवनाबद्दल म्हणा की कलम ३७० बद्दल म्हणा. धोपटमार्गा सोडू नको ही म्हण बदलायची वेळ झाली आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News