'सत्तेसाठी हापापलेल्या लोकांकडून पक्षबदल'; अजित पवारांची टीका

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Saturday, 27 July 2019

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून शिवसेना-भाजपशी जवळीक करणाऱ्या नेत्यांवर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. स्वतःच्या संरक्षणासाठी ही मंडळी पक्ष बदलत आहेत. स्वतःच्या संस्था, कारखाने वाचविण्यासाठी हे स्वार्थी आणि सत्तेसाठी हापापलेले लोक पक्षातून निघून जात आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत केली. 

हे लोक पक्षातून निघून गेले तरी नव्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन आम्ही पक्षसंघटन मजबूत करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघातील पक्षातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्यासाठी पवार आज सोलापुरात आले होते. या मुलाखतींनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

शिवसेनेवर टीका करताना ते म्हणाले, ‘‘सत्तेत राहूनही मोर्चे कशाला काढता? अधिकाऱ्यांना आदेश देण्याचे काम तुम्ही करायला हवे. शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवायला हवे. केवळ निवडणुका जिंकण्यासाठीच हे सर्व काही केले जात आहे. जनतेच्या प्रश्‍नांचे त्यांना काही देणे-घेणे नाही.’’ 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News