महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट लागू; जाणून घ्या काय होती कारणं ?

सकाळ वृतसंस्था (यिनबझ)
Tuesday, 12 November 2019

महाराष्ट्रात यापूर्वी दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागली होती.

मुबंई - राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यात कलम 356 लागू करण्याच्या शिफारसी वर राष्ट्रपतीनीं स्वाक्षरी केली आहे. महाराष्ट्रात आता राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. राजभवनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर यासंबंधीचं निवेदन दुपारीच शेअर करण्यात आलं होतं.  सहा महिन्यांसाठी ही राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे. दरम्यान कुठल्या पक्षाकडे बहुमताचा आकडा असेल आणि सिद्ध केलं तर ही राष्ट्रपती राजवट मागे घेता यऊ शकते आणि मग सरकार बनवायची संधी दिली जाऊ शकते. 

आत्ता पर्यंत महाराष्ट्रात तीन वेळा राष्ट्रपती राजवट लागू

महाराष्ट्रात यापूर्वी दोनवेळा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यानंतर 2014 मध्ये 32 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट लागली होती. ऐंशीच्या दशकात समाजवादी कॉंग्रेस स्थापन करीत शरद पवार यांनी राज्यातील पुलोद सरकारचे नेतृत्व केले होते. पण, त्यावेळी इंदिरा गांधी यांनी राज्यातील पुलोद सरकार बरखास्त करून त्याकाळी विधानसभेच्या मध्यवर्ती निवडणुका घेतल्या.

त्यामुळे महाराष्ट्रात 17 फेब्रुवारी 1980 ते 9 जून 1980 पर्यंत राष्ट्रपती राजवट होती. तसेच 2014 मध्ये 32 दिवसांसाठी अर्थात 28 सप्टेंबर 2014 ते 31 ऑक्‍टोबर 2014 या काळात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसने सहकारी पक्ष कॉंग्रेसचा पाठिंबा काढल्याने सरकार कोसळले. त्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. 

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? 

देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्‍य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करू शकतात. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News