आजोबा पुन्हा विचार करा, नातू रोहीत पवार यांची फेसबुक पोस्ट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 12 March 2019

पुणे : शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक न लढविण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, असे आवाहन पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य व पवार यांचे नातू रोहीत पवार यांनी केले आहे.

शरद पवार यांनी निवडणूक न लढविण्याचे काल जाहीर केले होते. त्यावर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. पवार विरोधकांनी हा आपला विजय असल्याचे सांगायला सुरवात केली आहे. रोहीत यांनी पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच हवेवर सत्तेवर आलेल्या पवार विरोधकांनी बेडकासाखे फुगून वक्तव्ये करू नका, असेही आव्हान दिले आहे. 

आपल्या फेसबुक पोस्टमध्ये ते म्हणतात,``राजकारणातले मोठमोठ्ठे लोक साहेबांच्या राजकारणाचा गौरव करत असताना काय म्हणतात हे आपणाला माहितच आहे. पण सर्वसामान्य लोकं काय म्हणतात याकडे पवार साहेब नेहमीच लक्ष देतात. म्हणूनच गेली 52 वर्षे फक्त राजकारणच नाही तर समाजकारणात देखील हिच एकमेव व्यक्ती आमच्यासाठी उभा राहू शकते अस सर्वसामान्य माणसांच मत आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या सहवासातून सुरू झालेला साहेबांचा हा प्रवास भेदभावाचं, जातीधर्माचं राजकारण न करता, गेली 52 वर्ष न थकता सर्वसामान्यांसाठी सुरू आहे, म्हणूनच पवार साहेबांच राजकारण कोणत्या हवेवर नाही तर सर्वसामान्यांच्या घरातून चालू होतं. हे मला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या दिवशीच अभिमानाने सांगू वाटतं, असं रोहीत यांनी म्हटलं आहे.

एक कार्यकर्ता म्हणून, साहेबांच्या प्रत्येक निर्णयाचा आदर हा असणारच आहे, पण या आदरच्या पुढे प्रेम असतं. आणि माझं आणि माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच प्रेम म्हणून आमच्या प्रत्येकाच हेच मत आहे की, साहेब आपण आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा, असे आवाहन त्यांनी केेले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News