या चार आमदारांचे महिलेसोबत ठुमके : व्हिडिओ व्हायरल

उज्ज्वलकुमार
Tuesday, 11 June 2019
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात या नाचावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत

पाटणा : बिहारमधील चार आमदारांनी मणिपूरमध्ये एका महिलेबरोबर केलेल्या नृत्याची चर्चा सध्या बिहारमध्ये रंगली आहे. नृत्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या आमदारांमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) दोन आणि संयुक्त जनता दल (जेडीयू); तसेच भाजपच्या प्रत्येकी एकाचा समावेश आहे. यासंदर्भात कारवाईची शक्‍यता आहे.

राज्याच्या राजकीय वर्तुळात या नाचावरून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. ईशान्येकडील विकासाचा अभ्यास करण्यासाठी हे चारही आमदार गेले होते. तेथे मणिपुरातील एका शहरात त्यांनी एका महिलेबरोबर नृत्य  केले. ‘राजद’चे आमदार यदुवंश प्रसाद यादव हे एका महिलेबरोबर असभ्य पद्धतीने नृत्य करत अल्याचे या व्हिडिओमध्ये दिसते.

अन्य तीन आमदार मात्र नुसते उभे असल्याचे दिसते. त्यातील एक आमदार या महिलेला मद्य देऊ करत असल्याचेही दिसते. यादव यांच्यासह ‘राजद’चे शिवचंद्र राम, भाजपचे सचिंद्र प्रसाद आणि जेडीयूचे राजकुमार राय हे आमदार या अभ्यास दौऱ्यावर 
गेले होते.

बिहार विधानसभेचे अध्यक्ष विजय कुमार चौधरी यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून, या आमदारांसोबत गेलेल्या विधानसभा सचिवालयातील अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला आहे. प्रसार माध्यमांद्वारे आपल्याला ही माहिती मिळाल्याचे चौधरी 
यांनी सांगितले. अधिकाऱ्यांकडून अहवाल आल्यावर संबंधितांविरुद्ध कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News