त्यांनी उचलला खारुताईंसाठी खारीचा वाटा

मिलिंद देसाई, बेळगाव
Wednesday, 31 July 2019

समाजासाठी कोणत्याही प्रकारचे लहान मोठे काम केले की त्याला खारीचा वाटा असे रामायण काळापासून म्हटले जाते; पण एका व्यक्तीने छोटी सेवा सुरू करीत खारुताईंची सेवा सुरू केली आहे.

शहर असो व ग्रामीण भाग विविध प्रकारच्या वृक्षांवर आपल्याला खारुताईचा मुक्त संचार आंनद देऊन जात असतो. त्यामुळेच खारुताईचे आकर्षण सर्वानाच असते; मात्र गेल्या काही वर्षात शहरी भागात खारूताई कमी होऊ लागल्या आहेत. 

धारवाड शहरातील अनेक झाडांवर खारूताई आहेत; पण वाहनांची वर्दळ आणि इतर कारणांमुळे खारूताईंना होणारा त्रास पासून धारवाड येथील संदीप साबळे यांनी सुभाष नगर रोड येथील झाडांवर प्लास्टिकची डबी ठेवली आहे. त्यामध्ये दिवसातून तीन वेळा खारूताईंसाठी विविध प्रकारचे खाद्य आणि पाणी ठेवले जाते त्यामुळे खारूताईंची खाद्यपदार्थ शोधण्यासाठी होणारी धडपड थांबली आहे. 

तसेच या भागात खारूताईंची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सामान्यपणे झाडांवर वावरणाऱ्या खारुताईं लहान किडे, पालेभाज्या व इतर प्रकारचे खाद्य खातात. मात्र शहरातील झाडांवर राहणाऱ्या खारूताईना थोडी समस्या होते. त्यामुळे खारुताईंची समस्या पाहून स्वीट मार्टचे मालक असणाऱ्या साबळे यांनी परिसरातील झाडांवर राहणाऱ्या खारूताईंसाठी खारीचा वाटा उचलला आहे. त्यामुळे खारूताईंच्या आवाज आणि त्यांचा वावर धारवाडवाशीयांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News