पदवीचा रौप्य महोत्सवासाठी ते पुन्हा महाविद्यालयात आले 

अतुल पाटील
Sunday, 28 July 2019

औरंगाबाद : पदवी मिळाली की महाविद्यालयाकडे काही विद्यार्थी ढुंकूनही पाहत नाहीत. मात्र, याचवेळी संस्थेशी असलेला स्नेह, आठवणी जपण्याचा प्रयत्न काहीजणांकडून वेगळ्या पद्धतीने तसेच निमित्ताने केला जातो. असाच वेगळ्या ढंगात आपल्या पदवीचा रौप्य महोत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थी तब्बल 25 वर्षांनी एमआयटी अभियांत्रिकी महाविद्यालयात आले होते. ते माजी विद्यार्थी आठवणींना उजाळा देत त्यातच रमल्याचेही पहायला मिळाले. 

1994 मध्ये अभियांत्रिकी पदवी मिळवलेले एमआयटीचे विद्यार्थी तब्बल 25 वर्षानंतर संस्थेत जमले. अजय कुकरेजा, शालिनी राठी, पायल छाबरा, रजनी पुरी, विवेक कंवर, नवदीप सिंगला, ज्योत्स्ना यादव, रितू अरोरा, मुनीश यादव, राजीव सक्‍सेना, विकास महाजन, संजय सिंग, आणि संदीप चोप्रा यांनी पदवीचा रौप्य महोत्सव संस्थेत प्राध्यापकांच्या उपस्थितीत साजरा केला. 

एमआयटीचे अध्यक्ष डॉ. यज्ञवीर कवडे यांची विद्यार्थ्यांनी भेट घेतली. महासंचालक मुनीश शर्मा, प्राचार्य डॉ. संतोष भोसले, प्राचार्य डॉ. निलेश पाटील, डीन डॉ. नितीन भालकीकर यांच्याहस्ते विद्यार्थ्यांना गौरवण्यात आले. विद्यार्थ्यांनी त्यांच्या प्राध्यापकांची भेट घेतली. नवीन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. देश विदेशाच्या विविध भागात कार्यरत असणाऱ्या माजी विद्यार्थ्यांना जोडण्याचे कार्य एमआयटी माजी विद्यार्थी विभागाचे प्रा. विनय चिद्री करत आहेत. 

एमआयटी संचालिका डॉ. शकुंतला लोमटे, प्रा. बिजली देशमुख, उपप्राचार्य डॉ. एच. एम. धर्माधिकारी, डॉ. सय्यद अजीज, सर्व विभाग प्रमुख यांची मुख्य उपस्थिती होती. सूत्रसंचालन प्रा. परमित कौर गिल यांनी केले. प्रा. सुप्रिया किनारीवाला यांनी आभार मानले.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News