"हे" दोघेही लवकरच एकत्र येणार

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019

अभिनेता जॉन अब्राहम आणि अभिनेता इम्रान हाशमी हे दोघेही लवकरच दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या चित्रपटातून एकत्र येणार आहेत.

अभिनेता जॉन अब्राहम हा ‘सत्यमेव जयते’, ‘शूटआऊट ॲट वडाळा’, ‘दोस्ताना’ सारख्या अनेक चित्रपटांमध्ये दिसून आला; तर अभिनेता इम्रान हाशमीचे ‘जन्नत’, ‘मर्डर’, ‘आशिक बनाया आपने’ सारखे चित्रपट गाजले.

हे दोघेही लवकरच दिग्दर्शक संजय गुप्ता यांच्या चित्रपटातून एकत्र येणार आहेत. हा चित्रपट संजय यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘गॅंगस्टर’ या चित्रपटाच्या थीमवर आधारित आहे.

या चित्रपटात १९८० ते १९९० या काळात मुंबईतील मिल बंदी, व्यावसायिकांचे खून, राजकारण, पोलिस आदी सर्व घटना दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाचे नाव सध्या गुलदस्त्यात आहे. सध्या जॉन त्याच्या ‘पागलपंती’त तर इम्रान ‘चेहरे’ या चित्रपटात व्यस्त आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News