हा दिग्दर्शक काढणार हे तीन चिञपट

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Tuesday, 4 June 2019

‘खली बली’, ‘फ्लॅट नंबर ४२०’, ‘भूतियापा’ अशा तीन चित्रपटांचे दिग्दर्शक मनोज शर्मा दिग्दर्शन करणार आहेत. 

दिग्दर्शक मनोज शर्मा यांचा कॉमेडी चित्रपट बनवण्यात हातखंडा आहे. या मार्चमध्येच त्यांनी दिग्दर्शित केलेला ‘शर्मा जी की लग गई’ हा कॉमेडी चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा बऱ्यापैकी प्रतिसाद मिळाला.

आता ते एक नव्हे; तर तब्बल तीन कॉमेडी चित्रपटांवर काम करत आहेत. ‘खली बली’, ‘फ्लॅट नंबर ४२०’, ‘भूतियापा’ अशा तीन चित्रपटांचे ते दिग्दर्शन करणार आहेत आणि या तिन्ही चित्रपटांची निर्मिती वन एंटरटेन्मेंट फिल्म प्रोडक्‍शन आणि प्राची मूव्हीज करणार आहेत.

शिवाय या चित्रपटांमध्ये बॉलीवूडमधील प्रसिद्ध कलाकार झळकणार आहेत. मनोज शर्मा म्हणतात, ‘चित्रपटाची कथा चांगली असली की चित्रपट सुपरहिट ठरतोच. आणि मी चांगल्या कथा घेऊनच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.’ मनोज शर्मा दिग्दर्शित हे तिन्ही चित्रपट बॉक्‍स ऑफिसवर काय कमाल करतात हे पाहूया. 
 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News