जालना जिल्ह्यातील या विधानसभा संघात "हे" नेते मैदानात

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 12 June 2019
  • या मतदारसंघात तीन तालुक्यांच्या गावांचा समावेश होतो.
  • अंबड तालुक्यातील चार सर्कल, जालन्यातील साडेतीन सर्कल व संपूर्ण घनसावंगी तालुका असा हा मतदारसंघ 
  • घनसावंगी मतदार संघात राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेश टोपे

जालना: जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात सर्व पक्षाने निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या मतदारसंघात तीन तालुक्यांच्या गावांचा समावेश होतो. अंबड तालुक्यातील चार सर्कल, जालन्यातील साडेतीन सर्कल व संपूर्ण घनसावंगी तालुका असा हा मतदारसंघ निर्मान झाला आहे.

घनसावंगी मतदार संघात राष्ट्रवादी कॅाग्रेसकडून माजी मंत्री तथा विद्यमान आमदार राजेश टोपे, शिवसेनेतर्फे हिकमत उढाण रिंगणात उतरतील, तसेत शिवसेनेते रमेश गव्हाड यांची चर्चा मतदारसंघात सुरु आहे. पंरतू जागा वाटपावरून मतभेद झाल्यास भाजपच्या वतीने अॅड. विश्वजित खरात, रमेश महाराज वाघ हेही या जागेवर दावा करण्याची शक्यता आहे. बहुजन वंचित आघाडी शिवाजी चौथे यांना आपल्याकडे आकर्षित करू उमेदवारी देऊ शकतात. 

युवा नेते विश्वजीत खरात यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणित साहित्य वाटप,  युवकांना रोजगार आणि शेकतरी शेतमजूर महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी कृतिशील आराखडा तयार केला आहे. विशेष म्हणजे सोशल मीडियाचा वापर करुण तरुणांना रोजगार देण्याचा कार्यक्रम आखला आहे. 

जालना लोकसभा मतदार संघात विधानसभेच्या पाचपैकी भोकरदन, परतूर व बदनापूर हे तीन विधानसभा मतदारसंघ भाजपच्या, जालना शिवसेना तर घनसावंगी मतदारसंघ राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News