"या" कर्मचाऱ्यांना कामावरून बडतर्फ करणार; सरकारचा निर्णय 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Sunday, 23 June 2019
  • देशातील भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
  • अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.
  • सर्वच कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची झाडाझडती घ्यावी, अशी सक्त सूचना केंद्र सरकारने सरकारी बँका, सार्वजनिक कंपन्या आणि सरकारी खात्यांना केली आहे

नवी दिल्ली : देशातील कामगारांच्या दृष्टीने एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सर्वच स्तरावरील कर्मचाऱ्यांना यामुळे धक्का बसणार आहे. देशातील भ्रष्ट आणि कामचुकार कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. अशा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. कार्मिक मंत्रालयाने सर्व सरकारी विभागांच्या सचिवांना त्याबाबत लेखी कळवले आहे

त्यामुळे सर्वच कर्मचाऱ्यांच्या कामगिरीची झाडाझडती घ्यावी, अशी सक्त सूचना केंद्र सरकारने सरकारी बँका, सार्वजनिक कंपन्या आणि सरकारी खात्यांना केली आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या क्षमतेचे परीक्षण निष्पक्षपणे व्हावे आणि एखाद्याला सक्तीची निवृत्ती देताना मनमानी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशी ताकीदही सरकारने दिली आहे. 

ही प्रक्रिया १५ जुलैपासून अंमलात येणार आहे. प्रत्येक महिन्याच्या १५ तारखेला सर्व सरकारी विभागांना कार्मिक मंत्रालयाकडे अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे. नुकतेच सरकारने सीमाशुल्क आणि केंद्रीय अबकारी खात्याच्या १५ अधिकाऱ्यांना व महिन्याच्या सुरुवातीला प्राप्तिकर खात्याच्या १२ अधिकाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. हाच नियम पुढे आमलात आणून चालू ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारची मोहीम चालू असल्याचे कळते आहे. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News