मुंबईत नव्हे, तर राज्यातील या शहरांत परवडणारी घरे..!

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Wednesday, 10 July 2019
  • मुंबई व्यतिरिक्त राज्यातील इतर शहरांत परवडणारी घरे शक्य असणार आहे.
  • राज्यातील विविध शहरांत १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

मुंबई : मुंबईत घराचे स्वप्न पूर्ण होणे आता अशक्य होणार आहे. सामान्यांना मुंबईत परवडणारी घरे घेणे शक्य नसल्याचे समोर आले आहे. मुंबईत गिरणी कामगारांशिवाय इतर कोणाला घर देणे शक्य नसल्याचे सांगण्यात आले.

म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. मात्र नागरिकांडी निराश न होता मुंबई व्यतिरिक्त राज्यातील इतर शहरांत परवडणारी घरे शक्य असणार आहे. राज्यातील विविध शहरांत १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत केली. 

म्हाडाच्या माध्यमातून औरंगाबाद, पुणे, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती आणि गिरणी कामगारांसाठी मुंबईत अशा एकूण १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत अल्प, अत्यल्प, मध्यम, उच्च गटासाठी किती घरे राखीव ठेवण्यात आली आहेत. मात्र गिरणी कामगारांसाठी मुंबईत घरे असणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले आहेत. 

जाणून घ्या कोणत्या शहरांत किती घरे उपलब्ध आहेत. 

विभाग  घरे 

  • पुणे मंडळ - २००० घरे 
  • नाशिक मंडळ ९२ घरे 
  • औरंगबाद मंडळ - १४८ घरे 
  • अमरावती मंडळ - १२०० घरे 
  • नागपूर मंडळ - ८९१ घरे 
  • कोकण मंडळ - ५३०० घरे 
  • गिरणी कामगार - ५०९० घरे 
  • एकूण घरे - १४ हजार ६२१ घरे 
     

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News