'या' भाऊंची स्टाईल भारीचं..!

स्वप्निल भालेराव (यिनबझ)
Thursday, 2 May 2019

मुंबई: 2019 ची लोकसभा निवडणूक यंदा युवा नेत्याच्या प्रचाराने चांगलीच गाजली. लोकसभा निवडणुकीने महाराट्राला काही नविन युवा चेहऱ्यांची ओळख करुन दिली. बहुजन वंचीत आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. सुजय विखे पाटील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदी युवा नेते प्रचारामुळे चर्चेच होतो.

मुंबई: 2019 ची लोकसभा निवडणूक यंदा युवा नेत्याच्या प्रचाराने चांगलीच गाजली. लोकसभा निवडणुकीने महाराट्राला काही नविन युवा चेहऱ्यांची ओळख करुन दिली. बहुजन वंचीत आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू पार्थ पवार, डॉ. अमोल कोल्हे, डॉ. सुजय विखे पाटील, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे आदी युवा नेते प्रचारामुळे चर्चेच होतो.

पारंपारीक संवादाला फाटा देत आधुनिक प्रचार करण्यात युवा नेते आघाडीवर होते. प्रत्यक्ष मुलाखत, रॅप, गाणी, चालता- बोलता संवाद, फेसबुक, ट्विटर, वाट्सअॅप, इंस्टाग्राम आदी समाजमाध्यमांचा वापर करुन जनतेशी संवाद साधला. तरुण मतदारांनी त्यांचं लग्न, डेटींगबाबद थेट प्रश्न विचारले होते. प्रचार आणि अन्य कार्यक्रमादरम्यान जनता आपणास भेटत असते. यावेळी स्थळ येतात का? लग्न केव्हा करणार? असे अनेक प्रश्न विचारण्यात आले होते.  युवकांनी विचारलेल्या प्रश्नांची सडेतोड उत्तरे तरुण नेत्यांनी दिली.

बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचाराची धुरा सुजात आंबेडकर यांनी सांभाळली. मुलाखती, भाषणे, प्रचार, आरोपत्यारोप करणारी सोशल मिडियाची टीम सुजात सांभाळत होता आणि सतत जनतेशी संवाद साधत होता. सुजात आंबेडकर नावाचा एक नवा चेहरा महाराष्ट्राला मिळाला.

पार्थ पवार यांनी लोकसभेच्या मावळ मतदार संघात अनपेक्षित एन्ट्री केली. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे बडे नेते पार्थ पवार यांच्या प्रचारात उतरले होते. हा 'राज'कीय थाट बाजूला करुन पार्थने मावळ मतदारसंघ पिंजून काढला. थेट आदिवासी समाजाच्या समस्या जाणून घेतल्या. तरुणाईला भेडसावणाऱ्या प्रश्नांना हात घातला. 

आदित्य ठाकरे यांनी शिवसेना उमेदवारांच्या प्रचारासाठी रॅली, सभा घेऊन प्रचार केला. त्याच बरोबर 'आदित्य संवाद' या कार्यक्रमाच्या माध्यमातून सहा लाख युवकांशी थेट तर आनेक युवकांशी डिजिटल संपर्क साधण्याचे ठरविले होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याप्रचाराबाबत विचारलेल्या प्रश्नांविषयी आदित्य यांनी दिलेल्या उत्तराची चर्चा राजकीय वर्तूळात रंगली होती.

बहूचर्चीत 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेतून, लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे तरुन अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरला. छत्रपतीचे राज्य निर्मान करण्यासाठी प्रचाराला सुरवात केली. युवकांनी त्यांना मोठ्या प्रमाणात साथ दिली. प्राचारात त्याच्या भुमिकेची चर्चा होती.

सेल्फीच्या माध्यमातून तरुणांना कायम आकर्षित करणारे व्यक्तीमत्त्व म्हणजे डॉ. सुजय विखे पाटील. जाईल तेथे तरुणांसोबत सेल्फी घेईल. युवकही आवर्जून त्यांच्यासोबत सेल्फी घेत ती सोशल मीडियावर आपापल्या ग्रुपवर शेअर करीत आहेत. त्यामुळे सेल्फीवाले डॉक्टर म्हणून युवकांमध्ये क्रेझ निर्माण झाली. त्यामुळे मतदारसंघात तरुणवर्ग जोडण्यात त्यांना यश आले होते. समाजकारण ही राजकारणाची दुसरी बाजू आहे. वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सुजयने आरोग्य कॅम्प लावले होते. ही माहिती सोशल मिडियाचा मोठ्या प्रमाणात वापरल करुन त्याचा प्रचार केला. हाच फंडा निवडणुकीत त्यांनी वापरला होता. लाखो तरुणाई त्याच्यासोबत जोडली गेली.   

आमदार संग्राम जगताप यांच्या मागे तरुणांचे मोहळच असते. युवकांशी सुसंवाद साधत ते कायम युवकांच्या गळ्यात हात घालून त्यांना आपलेसे करून घेतात. अर्ज भरण्याच्या दिवशी तर दिवसभर काढलेल्या रॅलीत तरुणांनी त्यांना जमिनीवर चालूच दिले नाही. डोक्यावर उचलून घेत तरुणांनी त्यांना लोकांना अभिवादन करायला लावले. त्यांनी प्रचारसभांमधूनही तरुणांची फळी तितकीच ताकदीने त्यांच्या मागेपुढे होती. सर्वत्रच तरुणाई त्यांच्या सोबत होती. 2019 ची निवडणूक ही युवा नेत्यांनी गाजवली. युवा नेत्यांना तरुण मतदारांनी मतदानाच्या स्वरुपात भरभरुन प्रेम दिले. 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News