रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यामुळे 'हे' फायदे 

सकाळ वृत्तसेवा (यिनबझ)
Thursday, 6 June 2019

लसणीत अनेक औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर लसूण जेवणाची चव वाढवते रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यामुळे  अनेक फायदे आरोग्यास होवू शकतात. हे फायदे कोणते ते पाहू.

लसणीत अनेक औषधी गुणधर्म असतात त्याचबरोबर लसूण जेवणाची चव वाढवते रिकाम्या पोटी लसूण खाल्ल्यामुळे  अनेक फायदे आरोग्यास होवू शकतात. हे फायदे कोणते ते पाहू.

पोटाचे त्रास कमी होतात. 
पोटाच्या अनेक तक्रारी लसणीचे सेवन केल्यानं कमी होतात. उकळलेल्या पाण्यात लसणीच्या पाकळ्या टाकून ते पाणी प्यावे यामुळे पोटाच्या अनेक समस्या दूर होतात. 

उच्च रक्तदाबापासून सुटका 
लसूण रिकाम्यापोटी खाल्ल्यामुळे उच्च रक्तदाबापासून सुटका मिळते. त्यामुळे उच्च  रक्तादाब असलेल्यांना लसूण खाण्याचा सल्ला दिला जातो.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर 
लसणीमुळे हृदयाचं आरोग्य उत्तम राहतं. यामुळे हृदय विकाराचा धोका कमी होतो.

सर्दी खोकल्याच्या त्रासापासून सुटका 
लसणीमुळे सर्दी- खोकला, अस्थमा यांसारखे त्रास कमी  होतात. 

पचनशक्ती सुधारते 
रिकाम्यापोटी लसूण खाल्ल्यानं पचनशक्ती  सुधारते. यामुळे भूक चांगली लागते. 

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News