हे आहेत सर्वात महागडे घटस्फोट ? पोटगी म्हणून मोजली इतकी रक्कम  

हर्षल भदाणे पाटील 
Wednesday, 23 January 2019

लग्नानंतर अल्पावधीतच घटस्फोट घेण्याच्या प्रकरणांमध्ये सध्या वाढ झालेली दिसते.यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी सर्वांत मुख्य कारण आहे, ते पैशांचा वाद. वैयक्तिक खर्च आणि बचत यासंबंधीची माहिती जोडीदार अनेकदा एकमेकांना सांगतच नाहीत. हेच त्यांच्यातील वादाचं कारण ठरतं.असेच काही महागडे घटस्फोट आपण पाहुयात...

लग्नानंतर अल्पावधीतच घटस्फोट घेण्याच्या प्रकरणांमध्ये सध्या वाढ झालेली दिसते.यामागे असलेल्या अनेक कारणांपैकी सर्वांत मुख्य कारण आहे, ते पैशांचा वाद. वैयक्तिक खर्च आणि बचत यासंबंधीची माहिती जोडीदार अनेकदा एकमेकांना सांगतच नाहीत. हेच त्यांच्यातील वादाचं कारण ठरतं.असेच काही महागडे घटस्फोट आपण पाहुयात...

एका अफेअरमुळे तुटला 25 वर्षांचा संसार
ऑनलाईन शॉपिंग कंपनी अॅमेझॉन चा मालक,जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती. शेअर बाजारात घडलेल्या उलाढालीमुळे, रातोरात जेफ बिल गेट्सला मागे टाकून सर्वात श्रीमंत बनला. आता या सर्वात श्रीमंत व्यक्तीचा घटस्फोट होऊ घातलाय. जेफ आणि त्याची पत्नी मॅकेन्झी बेझोस यांनी त्यांचा 25 वर्षांचा संसार मोडायचे ठरवेल आहे. नुकतेच या आशयाचे ट्वीटही त्यांनी केले होते. या घटस्फोटामुळे जेफच्या संपत्तीची विभागणी झाली तर, हा घटस्फोट जगातील सर्वात महागडा घटस्फोट ठरणार आहे. यानंतर जेफची पत्नी ही जगातील सर्वात श्रीमंत महिला बनेल. एका अफेअरमुळे त्यांचा 25 वर्षांचा संसार तुटलाय.

रूपर्ट मर्ढोक-अॅना टॉर्व  
मीडियाचे बादशाह रुपर्ट मर्ढोक यांनी १९९९मध्ये आपली दुसरी पत्नी अॅना टॉर्व हिला घटस्फोटानंतर पोटगी म्हणून तब्बल ८ हजार ६७० कोटी रुपये दिले होते. हा जगातील महाग घटस्फोट म्हणुन चर्चेत आला होता.

गोल्फर टायगर वुड्स- अॅलिन
प्रसिद्ध गोल्फपटू टायगर वुड्सने सहा वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर पत्नीला घटस्फोट दिला होता. यावेळी टायगरला आपल्या पत्नीला पोटगी म्हणून १०० मिलियन डॉलर म्हणजेच ६३७ कोटी रुपये द्यावे लागले होते. 

बर्नी-स्लाविका 
फॉर्म्युला वनचे बॉस बर्नी आणि त्यांची पत्नी स्लाविका यांच्या घटस्फोटानंतर स्लाविका यांना मिळालेल्या पोटगीमुळे त्या सर्वात श्रीमंत घटस्फोटित महिला बनल्या होत्या. स्लाविका यांना पोटगी म्हणून तब्बल १.२ बिलियन अमेरिकन डॉलर म्हणजेच ७७ अब्ज रुपये देण्यात आले होते.

दिमित्री रिबोलोवलेव आणि एलेना रिबोलोवलेव
 रशियाचे उद्योजक दिमित्री रिबोलोवलेव आणि एलेना रिबोलोवलेव यांचा, घटस्फोट 2014 मध्ये झाला.  दिमित्री रिबोलोवलेव यांना पोटगी म्हणून 30,134 कोटी 

हृतिक रोशननं सुझॅन खानला दिली इतकी पोटगी...
हृतिक रोशन आणि सुझान खान हे बॉलिवूडमधलं प्रसिद्ध जोडपं २०१६ मध्ये विभिक्त झालं. १७ वर्षांचा संसार मोडून दोघांनी घटस्फोट घेतला. खरं तर विभिक्त होण्याचा निर्णय बॉलिवूडच काय पण हृतिकच्या चाहत्यांसाठीही धक्कादायक होता. बॉलिवूडचे बेस्ट कपल म्हणून या दोघांकडे पाहिलं जायचं. शिवाय दोघंही बालपणीचे मित्र होते. दोघांचा तेरा वर्षाचा संसार 2013 मध्ये संपुष्टात आला. हृतिकपासून वेगळं होण्यासाठी सुझॅननं त्याच्याकडून 400 कोटी रुपयांची पोटगी मागितली होती अशा चर्चाही रंगल्या. मात्र 380 कोटी पोटगी देण्यास हृतिक मान्य झाल्याचं बोललं जातंय. हृतिक आणि सुझॅनचा घटस्फोट बॉलिवूडचा चर्चित घटस्फोट आहे.

आमिर खान - रीना दत्ता
आमिर खान याने त्याची पहिली पत्नी रीना दत्तला 2002 मध्ये घटस्फोट दिला. 'लगान' सिनेमाच्या शूटिंगवेळी आमिरची भेच किरण रावसोबत झाली. त्यानंतर आमिर आणि रीनाने घटस्फोट घेतला. रीनाने पोटगी म्हणून आमिरकडून 50 कोटी रूपये घेतले होते.

संजय दत्त आणि रिया पिल्लई  
संजय दत्तची पहिली पत्नी रिचा शर्माचा ब्रेन ट्युमरमुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर संजयने रिया पिल्लई सोबत लग्न केले. 1998 मध्ये  त्यांनी लग्न  केलं आणि 2005 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी संजय दत्तने रियाला पोटगी म्हणून 8 कोटी रुपये दिले होते.  

 

Become YINBuzz contributor. Write your stories, publish your photos and videos using Sakal Samvad App (*YINBuzz.com हा तरूणाईसाठीचा खुला डिजिटल फोरम आहे. इथे प्रसिद्ध झालेल्या मतांशी वेबसाईटचे व्यवस्थापन सहमत असेलच; असे नाही.)

Download Samvad App

Related News